संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 29:- विद्यार्थी नवयुवक बहुउद्देशीय मंडळ गादा तफै दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील 30व्या वर्षी दिवाळीच्या निमित्ताने गावातील नवयुवकाना एकत्रितपणे येणाच्या व विधार्थयाचा कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने आयोजित दहा दिवसीय सार्वजनिक शारदा उत्सव कार्यक्रमाचा 22 ऑक्टोबरला शुभारंभ करण्यात आला असून कार्यक्रम उत्साहात साजरा होत आहे.. तर उद्या 30 ऑक्टोबर ला सायंकाळी 7 वाजता सप्त खंजेरी वादक डॉ रामपाल धारकर महाराज यांचा समाजप्रबोधनकार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष सचिन डांगे यांनी केले आहे.
या उत्सवा दरम्यान दहा दिवस विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले असून या दहा दिवसीय कार्यक्रमाचा शुभारंभ 22 ऑक्टोबर ला सायंकाळी 6 वाजता माँ शारदा मूर्तीची स्थापना करून करण्यात आली त्यानंतर रात्री 9 वाजता श्री हनुमान मंदिर भजन मंडल गादाचे कार्यक्रम पार पडले,23 ओकटोबर ला रात्री 9 वाजता श्री गुरुकृपा भजन मंडळ गादा, 24 औक्टबर ला श्री गणेश मंडळ गादा,चे कार्यक्रम पार पडले .25 औक्टबर ला सायंकाळी 6 वाजतावल रांगोळी स्पर्धा रात्री 8 वाजता डान्स स्पर्धा तर 26 ऑक्टोबर ला रात्री 8 वाजता वन मिनिटं शो, तर 27 ऑक्टोबर ला , माँ कामाक्षी म्युझिकल ग्रुप कुही चे जस जागरण कार्यक्रम पार पडले ज्यामध्ये गायक सुरज कुमार धणजोडे यांनी गायनांतून मंत्रमुग्ध केले तर 28 ऑक्टोबर ला सायंकाळी 7 वाजता महाआरती, तर आज 29 ऑक्टोबर ला भव्य महाप्रसाद वितरण करण्यात आले ज्याचा हजारोच्या संख्येतील नागरिकांनी लाभ घेतला. उद्या 29 ऑक्टोबर ला सायंकाळी 7 वाजता सत्यपाल महाराज यांचे शिष्य सप्त खन्जेरी वादक डॉ रामपाल धारक महाराज यांचा समाजप्रबोधनकार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तर 31 ऑक्टोबर ला सायंकाळी 8 वाजता माँ शारदा मूर्तीचे विसर्जन करून या दहा दिवसीय शारदा उत्सवाची सांगता करण्यात येणार आहे..
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता अध्यक्ष सचिन डांगे, सुरज चिपडे,निलेश चौधरी, अमोल ठाकरे, मोहन मारबते, निरंजन गेंडेकार,मंगेश डांगे, अक्षय चौधरी,श्रीधर उकुंडे,सदानंद शेंडे, मुकेश वाघमारे,खुशाल येवले,प्रमोद डांगे,विनोद चौधरी ,प्रवीण ठाकरे,अंकुश ठाकरे,रामकृष्ण डांगे,गणेश ठाकरे,चंदू ऊसरे, लष्मण ठाकरे,वासुदेव चौधरी,रवींद्र देवतळे,गोपीचंद ऊसरे,राजकुमार भोयर,भारत गजभिये,नरेंद्र जुंनघरे ,विनोद लांबडे,युवराज चौधरी,संभा घरडे, संजय मस्कर,संदीप चौधरी,पंकज शेंडे, सुरेश डायरे,घनश्याम चकोले, शंकर टाले , आदि नी अथक परिश्रम घेतले .