संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कोळसा टॉल येथे भाड्याने वास्तव्य करीत असलेला आरोपीच्या घरात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गोमांस असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित आरोपीच्या घरी धाड घालून गोवंश जनावरांची कत्तल केलेला 1 टन गोमांस किमती 2 लक्ष रुपये व सत्तूर असा एकूण 2 लक्ष 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कारवाही पहाटे 4 दरम्यान केली असून गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव जाकीर कुरेशी अब्दुल करीम कुरेशी वय 36 वर्षे रा कोळसा टॉल कामठी असे आहे.
ही यशस्वी कारवाई जुनी कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यांच्या मार्गदर्शनार्थ डी बी स्कॉडने केली असून पुढील तपास सुरू आहे.