नागपूर :- महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या अंतर्गत उत्तर नागपूर येथील बेझनबाग मैदानावर भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. या सभेत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला की, येत्या १२ मे २०२५ रोजी संपूर्ण देशभरातून सुमारे १२ लाख अनुयायी बोधगया येथे रवाना होतील व बिहार सरकारवर दबाव टाकून हे आंदोलन यशस्वी करतील असे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विलास खरात होते. त्यांनी सभेमध्ये महाबोधी महाविहार १९४९ बी.टी.कायद्याची प्रतीकात्मक प्रत जाळून, हा कायदा रद्द करून त्याऐवजी एक नवीन न्याय्य कायदा लागू करण्याची मागणी केली. सभेतील प्रमुख वक्त्यांमध्ये सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ अधिवक्ता मोहम्मद प्राचा, बिहारचे आमदार सतीश दास, भंते विनयचर्य, भंते करुणाकरन, दीक्षाभूमी बचाव समितीचे अध्यक्ष राकेश धारगावे आणि अधिवक्ता स्मिता कांबळे उपस्थित होते आणि सर्वांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे संचालन शिल्पा नागदेवते यांनी केले आणि आभार प्रदर्शन भीम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीधर साळवे यांनी केले. हा कार्यक्रम महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन संघर्ष समिती, महाराष्ट्र च्यावतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश राऊत, किरण गोरखेडे, ज्ञानेश्वर कोकाणे, मनोज वाहणे, प्रवीण दानवे, पियुष धुळे, अश्विन देवगडे आदी कार्यकर्त्यांचे विशेष योगदान होते. असे दिलीप फुलझळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
१२ लाख लोक, बोधगया येथे करणार १२ मे रोजी, ऐतिहासिक आंदोलन !
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com