मनोज जरांगेंच्या सुरक्षेसाठी ओबीसी समाज सदैव तत्पर – हेमंत पाटील

– जरांगेंना धमकी देणाऱ्याला तात्काळ अटक करण्याची मागणी

मुंबई :- राज्यात मराठा आरक्षणासाठी सामाजिक क्रांतीची मशाल पेटवणारे मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिशी अवघा ओबीसी समाज उभा आहे. वेळ पडली तर जरांगेंच्या सुरक्षेसाठी आपल्या छातीचा कोट करून ओबीसी बांधव त्यांच्यासाठी लढतील, असे सुतोवाच इंडिया अगेन्स्ट करप्शनचे (आयएसी) राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी शुक्रवारी (ता.२५) केले. यूट्यूबच्या कमेंटबॉक्समध्ये कमेंट करीत जरांगेना धमकी देणाऱ्या अज्ञाताला पोलिसांनी तात्काळ बेड्या ठोकण्याचे आवाहन देखील पाटील यांनी केले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जरांगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली असली तरी, ओबीसी बांधव त्यांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहेत, असे पाटील यांनी स्पष्ट केले.जरांगे आपल्या प्राणाची चिंता न करता मराठा आरक्षणाच्या आंदोलनात टिकून आहेत. ते असल्या धमक्यांना भीक घालत नाहीत. त्यांच्या केसाला जरी धक्का लावायचा असेल तर हल्लेखोरांना १० मिनिटेच काय १० दशके विचार करावा लागेल, असा इशारा पाटील यांनी धमकी देणाऱ्या अज्ञाताना दिला आहे.

केवळ दहशत माजवण्यासाठी ‘बजाज बिश्नोई लीडर’ नावाचा वापर करून अशा प्रकारचा खोडसरपणा केला जात असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले. धमकी देणाऱ्या अज्ञाताना जोपर्यंत अटक केली जात नाही, तोपर्यंत मराठा-ओबीसी बांधव गप्प बसणार नाही, असा इशारा देखील पाटील यांनी दिला. वैचारिक लढाई ही विचारांनीच लढवावी लागते, हिंसाचाराने परिवर्तन होत नाही,असे मत हेमंत पाटील यांनी व्यक्त केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपा आयुक्त डॉ. चौधरी यांनी केली बस्तरवारी परिसरातील ट्रान्सफर स्टेशनची पाहणी

Fri Oct 25 , 2024
नागपूर :- बस्तरवारी ट्रान्सफर स्टेशनमुळे नागरिकांना होत असलेला त्रास आणि त्याबाबत नागरिकांच्या तक्रारी या अनुषंगाने तातडीने पर्यायी जागा शोधून त्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. पर्यायी जागेची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत सध्याच्या ट्रान्सफर स्टेशनमधून दुर्गंधी येणार नाही व नेहमी स्वच्छता रहावी याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. गुरूवारी (ता.२४) सतरंजीपुरा झोनमधील बस्तरवारी येथील कचरा ट्रान्सफर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!