नागपूर :-अ) पो. ठाणे कपिलनगर हद्दीत विश्राम नगर जवळील रोड वरून फिर्यादी रविकांत दयाराम सोमकुवर वय ४४ वर्ष रा. समता नगर, जनता आटा चक्की जवळ, कपिलनगर हे ड्युटीवर जात असता त्यांचे मागुन येणाऱ्या अज्ञात दुचाकी वाहन चालकाने फिर्यादीचे खिश्यातील सॅमसंग गॅलेक्सी पाए ३ मॉडेलचा मोबाईल चोरून नेल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे कपिलनगर येथे अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९ भादवि अन्वये गुन्हा नोंद होता.
गुन्हयाचे संमातर तपासात गुन्हे शाखा युनिट १ चे अधिकारी व कर्मचारी यांनी मिळालेल्या खात्रीशिर गुप्त बातमीदाराचे माहिती वरून सापळा रचुन आरोपी मोहम्मद कैफ मोहम्मद मुकीम, वय १९ वर्ष, रा. संगम नगर लुंबीनी बौध्द विहार जवळ, यशोधरानगर यास ताब्यात घेवून त्यांची सखोल विचारपूस केली असता आरोपीने वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीस नमुद गुन्हयात अटक करण्यात आली. आरोपीचे ताब्यातून सॅमसंग गॅलेक्सी कंपनीचा ए/३. मॉडेलचा मोबाईल किमती १०,०००/- रू. चा जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीस मुद्देमालासह पुढील कार्यवाहीस्तव कपिलनगर पोलीसांचे ताब्यात दिलेले आहे.
ब) दिनांक ११.०७.२००३ चे १७.१० वा. चे सुमारास गुन्हेशाखा युनिट क. १ पोलीसांचे पथक पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. हद्दित पेट्रोलिंग करित असता आर अॅण्ड सी कंपनी जवळ, सार्वजनिक ठिकाणी एक इसम त्याचे जवळ घातक शस्त्र घेवुन फिरत आहे. अशा मिळालेल्या माहिती वरून नमुद ठिकाणी जावुन घेराव टाकून आरोपी रविकुमार रामसखा दहीया वय २७ वर्ष रा. हिंगणा पोलीस ठाणे मागील झोपडपट्टी यास हातात एक लोखंडी चाकु घेवुन फिरतांना ताब्यात घेतले. आरोपीचे जवळुन एक लोखंडी चाकु जप्त करण्यात आला. आरोपीने सह पोलीस आयुक्त यांचे मनाई आदेशाचे उल्लघन केल्याने तसेच त्याचे हे कृत्य कलम कलम ४/२५ भारतीय हत्यार कायदा सहकलम १३५ म.पो.का अन्वये होत असल्याने आरोपीविरूध्द नापोअ रितेश तुमडाम यांचे फिर्यादीवरून पोलीस ठाणे एम.आय.डी.सी येथे गुन्हा नोंद करून आरोपीस एम. आय. डी. सी. पोलीसांचे ताब्यात दिले आहे.
क) दिनांक ११.०७.२०२३ चे १३.३० वा. चे सुमारास गुन्हेशाखा युनिट क. १ पोलीसांचे पथकाने पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून पोलीस ठाणे बेलतरोडी हद्दीत राहणाऱ्या एका १६ वर्ष वयाचे विधीसंघर्षग्रस्त बालक यास ताब्यात घेवून त्यांची सखोल विचारपूस केली असता त्याने पोलीस ठाणे बेलतरोडी हद्दीत जबरीने मोबाईल हिसकावून नेल्याची कबुली दिली. त्याचा अभिलेख तपासला असता तो पोलीस ठाणे बेलतरोडी येथे जबरी चोरीचे गुन्हयात गुन्हा केल्यापासून पळून गेला होता मिळालेला नव्हता. २) पोलीस ठाणे हुडकेश्वर येथील एका वाहन चोरीचे व एक मोबाईल चोरीचे गुन्हयात गुन्हा केल्या पासुन मिळालेला नव्हता, ३) पोलीस ठाणे सक्करदरा हद्दीत वाहन चोरीचे गुन्हयात पाहिजे होता. नमुद विधीसंघर्षग्रस्त बालकाने वरील चारही गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यास पुढील योग्य कारवाईस्तव बेलतरोडी पोलीसांचे ताब्यात दिलेले आहे.
वरील तिन्ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, पोलीस उप-आयुक्त (डिटेक्शन) यांचे मार्गदर्शना खाली पो. नि. अनिल ताकसांडे, सपोनि राजेन्द्र गुप्ता, पोउपनि दिपक ठाकरे, पोहवा बबन राउत, नितीन वासनिक, नापोअ रितेश तुमडाम, सोनु भावरे, मनोज टेकाम, हेमंत लोणारे, सुनीत गुजर, शरद चांभारे, अजय शुक्ला, योगेश सेलूकर, नितीन बोलकर यांनी केली आहे..