नागपूर :- गुन्हे शाखा अं.प.वि. पथकाचे अधिकारी व अंमलदार पो. ठाणे नंदनवन हहीत, पेट्रोलींग करित असतांना कुंभारटोली, चुनीलाल शेंडे चे घरासमोर, सिमेंट रोडवर एका महीलेवर संशय आले त्यावरून अंमलदार अनुप यादव यांनी महिले जवळ असलेली शेन्द्री रंगाचे पिशवी बाबत आरोपी महीलेला पिशवी मध्ये अंमली पदार्थ असल्याचा संशय असल्याचे सांगुन पंचासमक्ष एनडीपीएस कायदयाचे पालन करून तीचे जवळील शेन्द्री रंगाचे कापडी पिशवीची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यामध्ये एक प्लॉस्टीकची पारदर्शक पन्नी दिसुन आली. त्या प्रेसलॉक पन्नी मध्ये पांढऱ्या रंगाची पावडर दिसुन आली नमुद पावडर बाबत महीला प्रेमा राजेश गौर हिला विचारले असता तीने ती एम.डी ड्रग्स पावडर असल्याचे सांगितले. तीचे जवळुन १) ६ ग्रॅम ८३ मिली ग्रॅम एम.डी.(मफेड्रान), ड्रग सदृश पावडर कि अं. ६८,३००/- रु २) एक निळया रंगाचा ओपो कंपनीचा मोबाईल कि अं.. (4000/- 53) एक निळया काळसर रंगाचा रिअलमी कंपणीचा मोबाईल कि अं. १०,००० /- रु ४) रोख रक्कम १,५००/- रु असा एकुण ९४,८००/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी प्रेमा राजेश गौर वय ४३ रा शास्त्रीनगर वाठोडा रोड, एनआयटी गार्डन चे समोर पो स्टे नंदनवन नागपुर हिला ताब्यात घेवून तिची सखोल विचारपूस केली असता तीने नमुद एम डी ड्रग्स पावडर हे रूपभ उर्फ भोकण्या कान्हा शाहु रा हिवरी नगर नागपुर यांचे कडुन विक्री करीता खरेदी केल्याचे सांगितले. आरोपी विरूध्द पो ठाणे नंदनवन येथे कलम ८ (क) २२(ब), २९ एन.डी. पी.एस अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान यातील पाहीजे आरोपी क्र.२ नामे रूपभ उर्फ कान्हा महेश शाहु वय २९ रा.हिवरी नगर एलआयजी, क्वॉर्टर गल्ली नं. १० क्वॉर्टर नं. १०/१५ पो स्टे नंदनवन नागपुर हयाचा दिनांक ११/०७/२०२३ रोजी पो स्टे नंदनवन येथील तपास पथकातील अंमलदारांनी शोध घेवुन त्यास गुन्हयात अटक केली आहे.
वरील कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा अं.प.वि. पथक व नंदनवन पोलीसांनी संयुक्तरित्या पार पाडली.