नवी मुंबई :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापन दिनानिमित्त कोकण विभागीय स्तरावरील शासकीय ध्वजारोहण बुधवार दि.1 मे, 2024 रोजी सकाळी 08.00 वाजता विभागीय महसूल आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्याहस्ते कळंबोली सेक्टर 17 येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होणार आहे.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापनदिनाचा हा सोहळा लोकसभा निवडणूकीमुळे लावण्यात आलेल्या आचारसंहितेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन यशस्वीरित्या व उत्साहात साजरा होणार आहे. राष्ट्रध्वज वंदन व संचलन समारंभास नागरिक, पत्रकार, शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय पोषाखात उपस्थित राहावे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने कृपया कोणतीही बॅग सोबत आणू नये, उन्हाची तीव्रता लक्षात घेता उपस्थितांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.