-18 जानेवारीला मतदान
-19 जानेवारीला मतमोजणी
भंडारा :- राज्य निवडणूक आयोग यांचे दिनांक 17 डिसेंबर 2021 रोजीच्या पत्रान्वये जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 7 पंचायत समित्यांमधील अनारक्षित गटातील जागांसाठीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून तो पुढील प्रमाणे आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 21 डिसेंबर 2021 रोजी पार पडले आहे.
निवडणुकीच्या तारखांची सूचना व निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिध्द करण्याची तारीख बुधवार, 29 डिसेंबर 2021. संकेतस्थळावर भरण्यात आलेले नामनिर्देशनपत्र निर्वाचन अधिकाऱ्यांनी स्विकारण्याचा कालावधी बुधवार, 29 डिसेंबर 2021 ते सोमवार, 3 जानेवारी 2022 (सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत). रविवार, 2 जानेवारी 2022 रोजी नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार नाही. नामनिर्देशपत्राची छाननी व त्यावर निर्णय देणे मंगळवार, 4 जानेवारी 2022 रोजी (सकाळी 11 वाजल्यापासून). छाननी नंतर लगेचच वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक मंगळवार, 4 जानेवारी 2022. नामनिर्देशनपत्राचा स्विकार करण्याबाबत किंवा ते नामंजूर करण्याबाबतचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने दिलेल्या निर्णया विरुध्द जिल्हा न्यायाधिशांकडे अपील करण्याची शेवटची तारीख शुक्रवार, 7 जानेवारी 2022. जिल्हा न्यायाधिशांनी अपीलावर सुनावणी व निकाल देण्याची संभाव्य शेवटची तारीख सोमवार, 10 जानेवारी 2022. जिल्हा न्यायाधिशांनी अपिल निकालात काढल्यावर वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे सोमवार, 10 जानेवारी 2022. उमेदवारी मागे घेणे अ) जेथे अपील नाही तेथे सोमवार, 10 जानेवारी 2022 रोजी (सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत). ब) जेथे अपील आहे तेथे बुधवार, 12 जानेवारी 2022 रोजी सकाळी (11 ते दुपारी 3 पर्यंत). निवडणुका लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे व निशाणी वाटप. अ) जेथे अपील नाही तेथे सोमवार, 10 जानेवारी 2022 रोजी दुपारी 3.30 नंतर. ब) जेथे अपील आहे तेथे बुधवार, 12 जानेवारी 2022 रोजी दुपारी 3.30 नंतर. मतदानाची तारीख मंगळवारी, 18 जानेवारी 2022 (सकाळी 7.30 ते 5.30 पर्यंत). मतमोजणी तारीख बुधवार, 19 जानेवारी 2022 (सकाळी 10 पासून). निवडून आलेल्या सदस्याची नावे प्रसिध्द करणे सोमवार, 24 जानेवारी 2022 पर्यंत.
जिल्हा परिषदेच्या मतदार विभागाकरिता : तुमसर तालुक्यातील 4-चुल्हाड, 5-सिहोरा व 6-गर्रा यासाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्याची व त्यांची छाननी करण्याचे ठिकाण तहसिल कार्यालय, तुमसर व मतमोजणीचे ठिकाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय) तुमसर. मोहाडी तालुक्यातील 11-कांद्री, 12-डोंगरगाव, 15-वरठी यासाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्याची व त्यांची छाननी करण्याचे ठिकाण तहसिल कार्यालय, मोहाडी व मतमोजणीचे ठिकाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय) मोहाडी. लाखनी तालुक्यातील 24-लाखोरी, 25-मुरमाडी/सा, 26-केसलवाडा/वाघ व 28-मुरमाडी/तुप यासाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्याची व त्यांची छाननी करण्याचे ठिकाण पंचायत समिती कार्यालय लाखनी व मतमोजणीचे ठिकाण समर्थ विद्यालय लाखनी. भंडारा तालुक्यातील 38- सिल्ली यासाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्याची व त्यांची छाननी करण्याचे ठिकाण बचत भवन तहसिल कार्यालय भंडारा व मतमोजणीचे ठिकाण पोलीस बहुद्देशिय सभागृह, भंडारा. पवनी तालुक्यातील 43-ब्रम्ही व 45-भुयार यासाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्याची व त्यांची छाननी करण्याचे ठिकाण तहसिल कार्यालय, पवनी व मतमोजणीचे ठिकाण नगर परिषद कनिष्ट महाविद्यालय पवनी येथे आहे.
पंचायत समितीच्या निर्वाचक गणांकरिता : तुमसर तालुक्यातील 10-साखळी, 14-आंबागड, 17-खापा, 19-देव्हाडी व 20- माडगी करिता नामनिर्देशनपत्र सादर करण्याची व त्यांची छाननी करण्याचे ठिकाण तहसिल कार्यालय तुमसर व मतमोजणीचे ठिकाण औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय) तुमसर. मोहाडी तालुक्यातील 28-पाचगाव, 30-मोहगाव देवी व 32- पालोरा करिता नामनिर्देशनपत्र सादर करण्याची व त्यांची छाननी करण्याचे ठिकाण तहसिल कार्यालय, मोहाडी व मतमोजणीचे ठिकाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय) मोहाडी. साकोली तालुक्यातील 42-कुंभली, 43-वडद व 45-सानगडी करिता नामनिर्देशनपत्र सादर करण्याची व त्यांची छाननी करण्याचे ठिकाण तहसिल कार्यालय साकोली व मतमोजणीचे ठिकाण तहसिल कार्यालय साकोली. लाखनी तालुक्यातील 47-सालेभाटा, 52-केसलवाडा/वा व 57-किटाडी याकरिता नामनिर्देशनपत्र सादर करण्याची व त्यांची छाननी करण्याचे ठिकाण पंचायत समिती कार्यालय लाखनी व मतमोजणीचे ठिकाण समर्थ विद्यालय लाखनी. भंडारा तालुक्यातील 60-कोथुर्णा, 63-धारगाव, 69-खोकरला, 74-कोंढि व 78-पहेला करिता नामनिर्देशनपत्र सादर करण्याची व त्यांची छाननी करण्याचे ठिकाण बचत भवन तहसिल कार्यालय भंडारा व मतमोजणीचे ठिकाण पोलीस बहुद्देशिय सभागृह, भंडारा. पवनी तालुक्यातील 79- चिचाळ, 82- पिंपळगाव व 91-कोदुर्ली याकरिता नामनिर्देशनपत्र सादर करण्याची व त्यांची छाननी करण्याचे ठिकाण तहसिल कार्यालय, पवनी व मतमोजणीचे ठिकाण नगर परिषद कनिष्ट महाविद्यालय पवनी. लाखांदूर तालुक्यातील 93-मासळ, 98-भागडी व 103- पिंपळगाव/को याकरिता नामनिर्देशनपत्र सादर करण्याची व त्यांची छाननी करण्याचे ठिकाण शासकीय तांत्रिक विद्यालय (ITI) लाखांदूर व मतमोजणीचे ठिकाण शासकीय तांत्रिक विद्यालय (ITI) लाखांदूर आहे.