कोंढाळी :- जुनाणाणी उच्च प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेह संमेलनाचे उद्घाटन दिलीप वैद्य मुख्याध्यापक मासोद कामठी हायस्कूल यांच्या हस्ते योगेश वाढवे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती जुनापाणी या़च्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले प्रसंगी प्रमुख अतिथी ,मनोहर डोंगरे सोलुशन आर्किटेक पुणे , रामेश गाढवे केंद्र प्रमुख खुरसापार, किस्मत चव्हाण सरपंच ग्रामपंचायत जुनापाणी, उत्तम काळे उपसरपंच ग्रामपंचायत जुनापाणी, विश्वास देशमुख तंटामुक्त समिती अध्यक्ष जुनापाणी , साहेबराव कडवे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य जुनापाणी , टोपले ग्रामपंचायत सदस्य जुनापाणी, कालभूत ग्रामपंचायत सदस्य जुनापाणी, संजय किंनकर माजी उपसरपंच ग्रामपंचायत जुनापाणी, सुरेखाताई डोंगरे उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती जुनापाणी, हरिश्चंद्र देशमुख ,गजानन वैद्य, संदीप कुहीके ,दिलीप लक्षणे ,सविता बारंगे, प्रल्हाद गणोरकर, माधुरी पाठे, शालिनी देशमुख ,अर्चना गाडरे सदस्य शाळा व्यवस्थापन समिती आदी उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक प्रमोद बोडखे यांनी केले त्यात दोन वर्षा पुर्वी जुनापाणी येथील प्राथमिक शाळेत फक्त 34 विद्यार्थी होते सर्वाच्या प्रयत्नाने आज येथे 6 व 7 वा वर्ग सुरू झाला आहे व विद्यार्थ्यांची संख्या 64 झाली आहे असे सा़गितले कार्यक्रमाचे उद्घाटक दिलीपराव वैद्य यांनी जुनापाणी येथील शाळेची गुणवत्ता व विविध शालेय उपक्रमासाठी मुख्याध्यापक व सर्व शिक्षका़च्या कामाचे कौतुक करून या शाळेला 11000 रुपयाची देणगी दिली ,सोबतच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मनोहर डोंगरे यांनी सुद्धा शाळेला 10000 हजार रुपयाची देणगी दिली. कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुदर सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत केले.कार्यक्रमाचे संचालन अर्चना मोटे सहायक शिक्षिका जुनापाणी यांनी केलेक्षतर आभार सुनिता झाडे यांनी मानले .कार्यक्रमाच्या यशस्वी ते करता सुनंदा जामदार, छाया ढोबाळे, शकुंतला ढोबळे, पंकज काळे, विनायक फरकाडे इत्यादींचे सहकार्य लाभले.