अरोली :- राज्यातील शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान स्पर्धेचा तालुका स्तरीय निकाल गुरुवारी जाहीर झाला. तालुकास्तरीय शासकीय शाळा स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,तोंडली तालुका मौदा शाळेने तृतीय क्रमांक पटकावून जिल्हा परिषद ची तोंडली शाळा चमकली.
शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी.तसेच स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी वातावरण निर्माण व्हावे, यासाठी जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये हे अभियान राबविले होते . तोंडली शाळा नेहमीच विद्यार्थी हिताचे उपक्रम शाळेत राबवीत असते. माझी शाळा उपक्रमासाठी तोंडली शाळा पात्र ठरणार, याची खात्री होती. कारण, या स्पर्धेचे निकष तोंडली शाळेने प्रभावीपणे राबविले होते, असे शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा धूर्डे, शिक्षक निलेश जाधव, मार्गदर्शक म्हणून लाभलेले केंद्रप्रमुख अरविंद भिवगडे ,पालक, व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांचे योगदान आहे.
तोंडली शाळेने तिसरा क्रमांक पटकावल्याबद्दल तोंडली गट ग्रामपंचायत चे उपसरपंच रामपाल धांडे,माजी उपसरपंच सुरेंद्र बाभरे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मधुकर तिजारे, तोंडली गावातील सामाजिक कार्यकर्ते राजेश सपाटे ,अंकुश कातोरे ,श्रावण ईश्वरकार,विकास ढेगे यांनी अभिनंदन केले आहे.