संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- तरुणांनी पुढाकार घेऊन हिंदू संघटन अधिक बळकट करण्याचे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष व विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठी तालुक्यातील रणाळा येथे वीर बजरंगी सेवा संस्थांच्या वतीने आयोजित हिंदू युवा संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले. वीर बजरंगी सेवा संस्था कामठी तालुक्याच्या वतीने रनाळा पंकज मांगल कार्यालय चौक येथे आयोजित हिंदू युवा संमेलनाचे उद्घाटन प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी खासदार कृपाल तुमाने, आमदार टेकचंद सावरकर ,आमदार मोहन मते ,आमदार आशिष जयस्वाल ,टायगर ग्रुप ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी जाधव पैलवान,श्रीकांत आगलावे, निलेश टेकाडे, अनिल समुद्रे ,अमोल ठाकरे ,प्रताप खंडाईत, चेतन खडसे, प्रिन्स मारवा ,सुधीर अभ्यंकर ,प्रकाश शहा ,निरंजन लखन, जयराज नायडू, सरपंच पंकज साबळे, सुरेश गेडाम, विकास दुबे, राजू घोडे ,अतुल हजारे ,निखिल येलणे, राहुल किरपान, रवी चमके, नरेश गेडाम ,बादल झजाळ ,अरविंद कावळे, वैभव सुबनवार ,राजेश टंडन ,गजानन तिरपुडे ,स्वप्निल शिवणकर, अभिषेक जैन ,विकी बोरकर ,कुबेर महल्ले ,शुभम कुरील,सागर गिरी ,विशाल वाटकर तुषार ढबाले आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आमदार चंद्रशेखर बावनकुळे ,खासदार कृपाल तुमाने, आमदार टेकचंद सावरकर, आमदार मोहन मते,आमदार आशिष जयस्वाल व तानाजी जाधव मार्गदर्शन करताना म्हणाले व तरुणांनी पुढाकार घेऊन समाजात हिंदू राष्ट्राची जनजागृती करून हिंदू संघटन अधिक बळकट करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करणे कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य आयोजक चेतन खडसे यांनी केले संचालन जयराज नायडू यांनी केले व आभार प्रदर्शन सरपंच पंकज साबळे ,यांनी केले. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य प्रदीप सपाटे ,स्वप्नील फुकटे, प्रशांत साबळे सह मोठ्या संख्येने पुरुष, महिला व तरुण मंडळी उपस्थित होती.