नमो महारोजगार मेळाव्यात तरुणांनी सहभागी व्हावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या संकल्पनेतून राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे तरूणांना रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासोबतच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी नागपूर येथे दि. ९ व १० डिसेंबर 2023 रोजी नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात, ‘स्टार्टअप एक्सपो’ ही भरविण्यात येणार असून या आयोजनाची तयारी पूर्ण झाली आहे.

शहरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती रोडवरील जमनालाल बजाज प्रशासकीय भवन परिसरात उद्या (दि.9) सकाळी १० ला या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. दोन दिवसीय उपक्रमात सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेतच या स्टार्टअप एक्सपोचे आयोजन होणार आहे. या एक्सपोत स्टार्टअप्स, इनवेस्टर्स आणि इनक्युबेटर्ससह इच्छुकांनी सहभागी होण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

विदर्भातील तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी या महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजनासाठी 5 हजार उमेदवार क्षमतेचे सभागृह, आकर्षक मंच, माहिती व सुविधा केंद्र, ऑनस्पॉट नोंदणीकक्ष, मुलाखतीसाठी स्वतंत्र कक्ष व्यवस्था, देशभरातून येणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधी व अधिकाऱ्यांसाठी कक्ष तसेच माध्यम प्रतिनिधींसाठी माध्यम कक्ष अशा विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या मेळाव्यात महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने स्टार्टअप संकल्पनेच्या माहितीपासून ते यशस्वी उद्योजक बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींबाबत तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विभागाच्या वेगवेगवेगळ्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी इथे स्टॉल्सही उभारण्यात आले आहेत. स्टार्टअप सुरु करण्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधांची माहिती देण्यासोबतच इनोव्हेटर्सच्या सगळ्या शंकांचे निरसनही येथे केले जाणार आहे. या एक्सपोमध्ये स्टार्टअप्ससाठी इनक्यूबेटर्स, गुंतवणूकदार, ग्राहक, शासनासोबत काम करण्याची संधी, इनक्यूबेटर्ससाठी महत्वाकांक्षी नवउदयोजक, स्टार्टअप्स, इतर इनक्यूबेटर्सकडून प्रशिक्षणाच्या संधी निर्माण होतील.

मेळावास्थळी 50 नोंदणी स्टॉल उभारण्यात आले आहे. यातील 25 स्टॉल्स हे नवीन नोंदणीसाठी तर उर्वरित 25 स्टॉल्स ऑनलाईन नोंदणीच्या उमेदवारांसाठी आहेत. संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत.

गुंतवणूकदारांना स्टार्टअपसोबत जोडले जाण्याची संधीही उपलब्ध होणार आहेत. इनोव्हेटर्ससाठी स्टार्टअप योजना, शासकीय लाभ, यशस्वी स्टार्टअप, इनक्यूबेटर इत्यादींबद्दल माहिती या एक्सपोत मिळेल. उद्योगासाठी मनुष्यबळ, स्टार्टअप्ससाठी मार्गदर्शन, इन्व्हेस्टर्ससाठी गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होतील. यासाठी अधिकाधिक संख्येने स्टार्टअप्स, इनवेस्टर्स आणि इनक्यूबेटर्सनी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले आहे. महाराष्ट्रातील स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासासाठी आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांना, उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण २०१८ जाहीर केले. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व राज्यातील नाविन्यपूर्ण परिसंस्थेच्या अध्ययन आणि विकासासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी कार्यरत आहे. या माध्यमातून इच्छुकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही फडणवीस यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रामगिरी निवासस्थानी संत संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन

Fri Dec 8 , 2023
नागपूर :-  संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी शासकीय निवासस्थानी आयोजित जयंतीच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!