अमरदिप बडगे,प्रतिनिधी
गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील सरांडी येथील एका युवकाचा वैनगंगा नदी मांडगी येथे पाण्यात बूडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना 1वाजे दरम्यान घडली आहे.
मृतक युवकांचे नाव प्रणीकेत पराते वय 24 वर्षे राहणार सरांडी असुन तो माडगी येथील वैनगंगा नदीवर नातेवाईकांच्या पिंडदान विधी कार्यक्रमात गेला होता. पाण्याची खोलवर पातळी त्याला समजून न आल्याने तो पाण्यात बुडाला अवघ्या दोन तासांनी त्यांचा मृतदेह पाण्याचा बाहेर काढण्यात यश आले. सदर युवकांच्या मृत्युमुळे सरांडी गावात शोककळा पसरली आहे.