संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- काँग्रेसचे पूर्व अध्यक्ष तथा लोकसभेचे खासदार राहुल गांधी यांना सुरतच्या कोर्टाने एका विषयावर दोषी ठरवुन दोन वर्षाची सजा सुनाव ल्याने राहुल गांधी यांची लोकसभेची सदस्यता रद्द केली. या विरोधात नागपुर जिल्हा युवक कॉंग्रेस व्दारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे केंद्र सरकार व मोदींच्या विरोधात मुर्दाबाद चे नारे आणि घोषणाबाजी करून विरोध प्रदर्शन करण्यात आला.
राहुल गांधी यांना ही सजा केंद्र सरकार च्या दबावा मध्ये सुनावली आहे. या हुकुमशाही धोरणा चा विरोध करित केंद्र सरकार, व नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा बाजी करून विरोध प्रदर्शन करण्या त आला. याप्रसंगी नागपुर जिल्हा ग्रामिण युवक कॉंग्रेस अध्यक्ष मिथीलेश कान्हेरे व रामटेक विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष निखिल दा.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपुर जिल्हा युवक कॉंग्रेस सचिव रोहित बर्वे व युवक कॉंग्रेस कार्यकर्ता अजय कापसिकर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे केंद्र सरकार व मोदींच्या विरोधात मुर्दाबा द चे नारे, घोषणाबाजी करून विरोध प्रदर्शन करण्यात आला. याप्रसंगी नागपुर जिल्हा ग्रामिण युवक कॉंग्रेस महासचिव गौरव भोयर, नगरसेवक मनिष भिवगडे, महेश धोगडे, सोहेल सय्यद, चेतन नांदुरकर, प्रफुल राऊत, दुर्गेश शेंदरे, आकाश दुबे, प्रशांत पटेल, मोनु गुप्ता, बाबु सय्यद, स्यामरण जॉर्ज, प्रज्वल मेश्राम, स्वप्नील चवरे आदी सह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.