जयभीम चौकात तरुणाची गळफास लावून आत्महत्या.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 12 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जयभीम चौक रहिवासी 24 वर्षीय तरुणाने घरी कुणी नसल्याचे संधी साधून घरातच दुपट्ट्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल दुपारी 12 दरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव राहुल मेंढे वय 24 वर्षे रा जयभीम चौक ,कामठी असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतकाचे घरमंडळी कामानिमित्त घराबाहेर पडले असता अज्ञात कारणावरून सदर तरुणाने आपल्या राहत्या घरातील खोलीत दुपट्ट्याने गळफास लावून आत्महत्या केली .ही घटना सायंकाळी 5 वाजता मृतकाची बहिण घरी आली असता निदर्शनास आली. आत्महत्येचे हे दृश्य बघून सर्वानाच धक्का बसला.

घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.पोलिसानी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे तर आत्महत्येचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

उन्हाळी हंगामात प्रवाशांचा सुरळीत प्रवास सुनिश्चित करण्यासाठी 217 विशेष रेल्वेगाड्या चालवण्याच्या निर्णयाचे पंतप्रधानांकडून स्वागत

Thu Apr 13 , 2023
नवी दिल्ली :-उन्हाळी हंगामात प्रवाशांचा सुरळीत प्रवास सुनिश्चित करण्यासाठी 217 विशेष रेल्वेगाड्या चालवण्याच्या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे पत्र सूचना कार्यालयाचे ट्विट सामायिक करत पंतप्रधानांनी ट्विट केले: ” यामुळे उन्हाळ्यात प्रवास आरामदायी होईल आणि कनेक्टिव्हिटी वाढेल.” Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!