संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील नेरी शिवारातील वीट भट्टी जवळील खड्ड्यात आंघोळी करिता गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारला दुपारी दोन वाजता घडली असून ललित रतन यादव वय 22 वर्ष असे मृत्त तरुणाचे नाव आहेत नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नेरी शिवारातील पाल वीट भट्ट्यावर काम करणारा ललित रतन यादव वय 22 वर्ष हल्ली मुक्काम पाल वीटभट्टा नेरी तेथेच वास्तव्याला राहून वीट भट्टीवर विटा तयार करण्याचे काम करीत होता ललित यादव दिवसभर काम करून दुपारी दोन वाजता सुमारास वीट भट्टी जवळील खड्ड्यात आंघोळी करिता गेला असता खोल पाण्यात गेल्याने पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला लगेच शेजारी नागरिक धाऊन गेले त्याला बाहेर काढले असता तो बेशुद्ध झाला होता त्याला उपचाराकरिता कामठी उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत्त घोषित केले मृतकाचे वडील रतन यादव यांच्या तक्रारीवरून नवीन कामठी पोलीस स्टेशनला बीएनएनएस कलम 194 भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल प्रकाश भालेकर करीत आहेत मृतक ललित रतन यादव वय 22 वर्षे हा मूळचा सुंदरी गाव तालुका पल्लारी जिल्हा बडोदा बाजार छत्तीसगड येथील रहिवासी आहे.