नागपूर :- नववा आंतर्राष्ट्रीय योग दिन आज दिनांक 21 जून, 2023 रोजी संपूर्ण भारतात साजरा करण्यात येत आहे. या वर्षीच्या आंतर्राष्ट्रीय योग दिवसाची थीम वसुधैव कुटुंबकम साठी योग बाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी आणि नागरिक, विद्यार्थी यांनी योग करणे सुरू करावे या उद्देशाने भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय नागपूरच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन कामगार कल्याण मंडळ, नागपुरच्या सहयोगाने ललित कला भवन, इंदोरा, नागपुर येथे सकाळी 06.00 वाजता द्विप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळेला योग प्रशिक्षक संगीता सोनसल आणि प्रणय साखरकर यांच्या द्वारे उपस्थितां कडून विविध प्रकारची आसने, योग क्रिया आदी करवून घेण्यात आल्या . या प्रसंगी कवि वसंत करोडे ,वय-८२ वर्ष व ज्योती जनबंधू (जेष्ठ समाजसेविका) कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि म्हणून लाभले. महाअनिसचे कार्याध्यक्ष चितरंजन चौरे, कामगार कल्याण मंडळाचे निरिक्षक देवेन्द्र दत्त तसेच मोठ्या संख्येने युवावर्ग प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच रंगधून कलामंचचे कलाकारां द्वारे कलापथकाचे सादरीकरण करण्यात आले.
केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय नागपूरच्या वतीने वसुधैव कुटुंबकम साठी योग
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com