संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी – कामठी तालुक्यातील येरखेडा ग्रामपंचायत कार्यालय परिसरात जागतिक योग दिनाचे पर्वावर योग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते जागतिक योग दिन कार्यक्रमाची सुरुवात येरखेडा ग्रामपंचायतचे सरपंच मंगल कारेमोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी योगतज्ञ पोर्णिमा कावळे ,सुषमा राखडे, वंदना भस्मे, वैशाली भांडारकर ,नीलिमा मोरघडे ,उर्मिला बाहेकर ,उर्मिला गड्रे ,कांचन इंगोले ,मीना अग्रवाल ,वैशाली खोब्रागडे, रिद्धी खोब्रागडे , हर्षा तालोत, अपूर्वा तिडके ,सुनंदा लहाडे ,माला सिंगनाथ ,नूतन मुळे ,कांचन तपासे ,वनिता नाटकर, पूर्णीमा बरवे, मंगला पाचे , राजश्री धिवले, मुक्ता कारेमोरे, सरिता भोयर उपस्थित होते जागतिक योग दिन कार्यक्रमात योग्य तज्ञ प्रशिक्षका पौर्णिमा कावळे यांनी मानवी जीवनात योगाचे महत्त्व समजावून सांगून पद्मासन ,ताडासन ,वक्रासन ,सव्वा सण ,त्रिकोणासन ,भुजंगासन, मयूरासन सूर्यनमस्कार, विविध आसनाचे प्रात्यक्षिक व्यक्तीने नियमित योगा केल्यास निरोगी जीवन प्राप्त होत असून नियमित योगासन करण्याचे आव्हान केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच मंगला कारेमोरे यांनी केले संचालन सुषमा राखडे यांनी केले व आभार प्रदर्शन नूतन मुळे यांनी मानले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होते.