संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या येरखेडा ग्रा. प. हद्दीतील नागपूर महामार्गावरील एका पॉश वसाहतीच्या कडेला असलेल्या राज रॉयल लॉन संचालकांचा मागील काही महिन्यांपासून मनमानी कारभार सुरू असून ग्रा प प्रशासनाच्या अभयपणामुळे या लॉन मध्ये होणाऱ्या कार्यक्रमातुन टाकाऊ अन्न तसेच वाहते पाणी रस्त्याच्या कडेला उघड्यावर फेकत असल्याने परिसरातील वातावरण प्रदूषित होत असून दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे तर ही परिस्थिती नागरिकांना रोग राईचे निमंत्रण देणारी असल्याने येथील शेजारी नागरिकांच्या नाकी नऊ आले आहे यासंदर्भात शिवसेना चे पदाधिकारी राजन सिंह यांच्या नेतृत्वात येरखेडा ग्रा. प. ला पत्रव्यव्हहार करून परिस्थितीशी अवगत करुन देत या लॉन मालकावर कायदेशीर कारवाही करून रोगराईस निमंत्रण देणारा प्रकार बंद करावा यासाठी निवेदन देण्यात आले मात्र यावर येरखेडा ग्रा. प. प्रशासनातर्फे कुठलीही ठोस करवाही होत नसल्याने सदर राज रॉयल लॉन चा मनमानी कारभार सुरू आहे तेव्हा आज शिवसेना तर्फे ग्रा प प्रशासन विरोधात एल्गार पुकारून येरखेडा ग्रा प मुर्दाबाद चे नारेबाजी करण्यात आले यावर येरखेडा ग्रा प सरपंचाने आश्वासित केल्यावरून शिवसेना तर्फे काढलेल्या एल्गार आंदोलन मागे घेण्यात आले.
या एल्गार आंदोलनात राजन सिंह उप जिल्हा प्रमुख कामठी मौदा विधानसभा पवन शर्मा, युवा सेना सचिव ,शरद भूषणवार महाराष्ट्र शिव माथडी कामगार सेना उप जिल्हा प्रमुख, शुभम तडसे कामठी शहर युवासेना प्रमुख ऋषभ उजैनवार, राजू टुप्पट,गणेश सायरे सौरभ गुप्ता, आकाश मल्लेवार, विवेक शर्मा ,हरीश यादव ,अमर केजरकर ,ऋषि जरोंदे,राजा पिल्ले, संकेत गुप्ता ,विनोद बावने, आकाश ठाकरे ,शुभम गजभिये, अनुराग नेति, गोलू पिल्ले, संदीप ढाबले, चिंटू पिल्ले, सूरज अतराम, गजू भाऊ,अरविंद सिद्धम ,कृष्णा खंडेलवाल,सुशील भाऊ, अविनाश हरिनखेड़े,पंकज शरणागत आदी उपस्थित होते.