संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 21:- आविष्कार फाउंडेशन इंडिया सामाजिक संस्थेच्या वतीने सामाजिक,शैक्षणिक, क्रीडा,आरोग्य,सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या 15 वर्षापासून कार्यरत संस्थेच्या वतीने विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तीना अविष्कार फाऊंडेशन इंडिया द्वारे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, कामठी तालुक्यातील येरखेडा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापिका संगीता विवेक अवसरे यांनी 28 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सोबतच कोरोना कालावधीत सातत्याने विद्यार्थ्यासाठी नवनवीन उपक्रमाद्वारे शैक्षणिक कार्य करणाऱ्या उच्चशिक्षित, विद्यार्थीनिष्ठ शिक्षिका संगीता विवेक अवसरे पदवीधर शिक्षिका उच्च प्राथमिक शाळा येरखेडा यांची उल्लेखनीय कार्याबद्दल संस्थेद्वारे निवड करण्यात आलेली असून नुकतेच हिंदी साहित्य संमेलन सभागृह नागपूर येथील एका समारंभात संस्थेच्या द्वारे त्यांना हा पुरस्कार मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी नागपूर नगरीचे
माजी महापौर दयाशंकर तिवारी, कल्पना पांडे, संस्थेचे केंद्रीय अध्यक्ष संजय पवार (पत्रकार), संस्थेचे उत्तरभारत प्रमुख अशोक कापटा, पौर्णिमा कापटा, नागपूर विभागाचे संस्था प्रमुख सुधाकर पाटील याचेंसह अनेक मान्यवरच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्काराने पुढील शैक्षणिक कार्य करण्यास प्रेरणा व उत्साह मिळेल असे मत संगीता अवसरे यांनी यावेळी व्यक्त केले.
सदरहू पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल विवेक अवसरे, संजय चामट,कमलाकर हटवार,चेतना मुरमे,कल्पना दषोत्तर,रजनी ब्रम्हे, भारती नासरे,ललिता चामट, प्रमीला तिडके, स्वेता समरीत ,शारदा भोयर,अल्का ढोबळे,वैशाली साखरकर,संध्या ब्राम्हणकर, रीना मोहोड, संगीता मानकर यांचे सह अनेक शिक्षक शिक्षिका अभिनंदन केले आहे.
येरखेडा जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता विवेक अवसरे आविष्कार नारीशक्ती पुरस्काराने सम्माणीत.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com