विद्यापीठात वल्र्ड आय.पी.आर. डे उत्साहात संपन्न

– पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्कबाबत विद्याथ्र्यांना मार्गदर्शन

अमरावती :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील इनोव्हेशन, इन्क्युबेशन अॅन्ड लिंकेजेसच्यावतीने विद्याथ्र्यांना इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईटची माहिती व्हावी या उद्देशाने कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच वल्र्ड आय.पी.आर. डे चे आयोजन करण्यात आले होते.या माध्यमातून विद्यार्थी संशोधन अथवा इनोव्हेशनची जपवणूक करू शकतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर, प्रमुख अतिथी म्हणून कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी योगिता पवार यांनी विद्याथ्र्यांना पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क आदींविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. प्रास्ताविकातून संचालक डॉ. स्वाती शेरेकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका मांडली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता अमोल हिरूळकर, नरेश मोहाळे, अंकित ठाकूर, रवी ढेंगळे यांनी परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची धडक कारवाई

Wed Apr 19 , 2023
नागपूर :-स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता.१८) ३ प्रतिष्ठानांवर कारवाई करून १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात १ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच ४ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com