संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी – युवा चेतना मंच व सुचना व प्रसारण मंत्रालय भारत सरकार केन्द्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय नागपूर व नेहरू युवा केन्द्र यांच्या संयुक्त विद्ममाने ‘जागतिक पर्यावरण दिनाचा ‘ कार्यक्रम विठ्ठल रूक्मीणी मंदीर रनाळा येथे केन्द्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय प्रमुख संजय तिवारी , कामठी पंचायत समीतीच्या सभापती दिशाताई चनकापुरे , नेहरू युवा केन्द्र चे जिल्हा युवा अधिकारी उदयवीर सिंग , सृष्टी सौंदर्य बहुउद्देशीय संस्था चे अध्यक्ष ऋषिकेश किंमतकर , माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल निधान , कामठी पंचायत समीतीच्या माजी उपसभापती विमलताई साबळे , युवा चेतना मंच चे राष्ट्रीय सचिव दत्ता शिर्के , ग्रीनर प्रोजेक्ट चे संचालक सचिन नायडू , रनाळा ग्रामपंचायतचे उपसरपंच अंकीताताई तळेकर ,सामाजिक कार्यकर्ते शकीब रहमान ,ग्रामपंचायत सदस्य व दिव्यांग फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रदीप सपाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आले . याप्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिप प्रज्वलन करून परीसरात संरक्षकासह वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी पर्यावरण क्षेत्रात विशेष कार्य करणारे ग्रीनर प्रोजेक्ट चे संचालक सचिन नायडू व संपूर्ण समुहाचे यांचा विशेष कार्यकरीता सत्कार करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून सचिन नायडू यांनी सामुहिक रित्या पर्यावरण संरक्षणाची जवाबदारी सर्वांनी घेतली पाहिजे असे मत मांडले . चित्रकला व रांगोळी स्पर्धे मधील विजेत्यांना व सहभागी यांना देखील पुरस्कार व प्रशस्तीपत्र देऊन सम्मानीत करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहूने म्हणून कामठी निधी अर्बन बैंक चे संचालक नितीन ठाकरे , जे.सी.आय ग्रुप नागपूर च्या अध्यक्षा मंजुताई कारेमोरे ,रनाळा ग्रामपंचायतचे सदस्य मंगलाताई ठाकरे, सुनिताताई नदेश्वर , स्मिताताई भोयर उपस्थित होते. याप्रसंगी पर्यावरण संरक्षणा विषयी सामुहिक शपथ घेण्यात आली.याप्रसंगी रंगधुन कला मंच समुहा तर्फे पर्यावरण विषयावर आधारीत पथनाट्य सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता अढाऊ प्रास्ताविक प्रा.पराग सपाटे आभार अक्षय खोपे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता बाँबी महेंद्र, प्रफुल्ल बावनकुळे, प्रिती हिवरेकर , भावना सपाटे , अर्चना सपाटे, अमोल नागपुरे , अक्षय खोपे , चंदू चडडूके , जी.नरेश , सौ विघा बल्लारे , संगिता अढाऊ, दिव्यांशु बोरकर, आदींनी अथक परीश्रम घेतले.