प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत कार्यशाळा संपन्न

भंडारा :- प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतर्गत एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन नुकतेच जिल्हा नियोजन भवन येथे करण्यात आले होते. या कार्यशाळेला संगिता माने,जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, या प्रामुख्याने उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाला मनिषा पाटील जिल्हा नोडल अधिकारी (PMFME) तथा कृषि उपसंचालक,भंडारा, किशोर पात्रीकर, उपविभागीय कृषि अधिकारी, साकोली, अजय राऊत (कृषि उपसंचालक आत्मा), अ एम कोटांगले (उपविभागीय कृषि अधिकारी भंडारा),मंडळअधिकारी (महसुल), तलाठी (सर्व), जिल्ह्यातील ग्रामसेवक, गट विकास अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, ई. मार्गदर्शक तसेच तालुका कृषि अधिकारी (सर्व) मंडळ कृषि अधिकारी (सर्व),कृषि पर्यवेक्षक (सर्व),जिल्हा संसाधन व्यक्ती (सर्व), कृषि सहाय्यकभंडारा, FLO तथा तंत्र सहायक उपस्थित होते.

या कार्यशाळेचा उद्देश शासनाच्या विविध विभागातील अधिकारी कर्मचारी यांचे मार्फत शेतकरी वर्गापर्यंत पोहोचविणे हा होता. सर्वप्रथम संगिता आर. माने,जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारायांनी सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक केले. या कार्यशाळेच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना याकरिता विविध विभागातील तज्ञ सदर कार्यशाळेमध्ये मार्गदर्शनाकरिता आमंत्रित करण्यात आलेले होते.

यानंतर किशोर पात्रीकर, उपविभागीय कृषि अधिकारी, साकोली यांनी गटाचे अर्ज कशाप्रकारे करायचे व केलेल्या अर्जाची माहिती तसेच योजनेचा उद्येश, पात्रतेचे निकष, पात्र प्रकल्प, आर्थिक मापदंड, योजनेची माहिती जाणून घेऊन उद्योग निर्माण करा, या उद्योगांची मार्केटिंग करण्यासाठी विविध उपक्रम राबवू अशी ग्वाही देत जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन किशोर पात्रीकर, उपविभागीय कृषि अधिकारी, साकोली यांनी केले.

तसेच मनिषा पाटील जिल्हा नोडल अधिकारी (PMFME) तथा कृषि उपसंचालक,भंडारा, यांनी योजनेमधील विविध घटक वैयक्तिक व गट लाभार्थी,सामाईक पायाभूत सुविधा, मार्केटिंग व Branding याबाबत माहिती दिली. तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेची प्रचार प्रसिध्दी वाढावी या दृष्टीने PMFME योजने अंतर्गत सेंद्रीय गुळ उत्पादनाचे स्टाल लावण्यात आले. स्टालला उपस्थितांचा भरपुर प्रतिसाद मिळाला.

या जिल्हास्तरीय कार्यशाळेला भंडारा जिल्ह्यातील योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असणारे लाभार्थी , महिला शेतकरी, बँकेकडे प्रस्ताव प्रलंबित असलेले लाभार्थी, माविम मधील गटातील महिला शेतकरी ,कृषि विभागतील अधिकारी /कर्मचारी तथा तंत्र सहायक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार तंत्र अधिकारी वाय. डी राऊत भंडारा यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वर्सोवा-विरार सी लिंकला जपान करणार संपूर्ण सहकार्य जपानचे आर्थिक, व्यापार आणि उद्योग मंत्री यांची देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट

Fri Aug 25 , 2023
– इशिकावा गुंतवणूकदार 2024 आरंभी महाराष्ट्रात येणार – मित्सुबिशी करणार पुण्यात सॉफ्टवेअर क्षेत्रात गुंतवणूक – नागपुराताल आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर सहकार्यासाठी केले एनटीटीला निमंत्रित – जायका भेटीत सुद्धा वर्सोवा-विरार प्रकल्पासाठी सहकार्याची विनंती – मुंबई पूर व्यवस्थापन प्रकल्पासाठी मागितले जायकाचे सहकार्य – जपान पंतप्रधानांच्या विशेष सल्लागारांसमवेत बैठक, मेट्रो-3 अडथळे दूर केल्याबद्दल गौरवोद्गार टोकियो :- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपानचे केंद्रीय आर्थिक, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com