कामठी पंचायत समिती येथे बाल हक्क संरक्षण विषयावर कार्यशाळा संपन्न

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी पंचायत समिती सभागृह येथे जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय जिल्हा बाल संरक्षण कक्ष व इंडियन सोशल सर्विस युनिट ऑफ एज्युकेशन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील या ग्राम बाल संरक्षण समिती सदस्यांचे आज 24 नोव्हेंबर ला प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षणामध्ये बालकांचे अधिकार आणि संरक्षण ग्राम बाल संरक्षण समिती सदस्यांची भूमिका बालविवाह बालकामगार तसेच बालकांचे लैंगिक शोषण विषयांची माहिती देण्यात आली संरक्षण समिती यांच्या नियमित बैठका व्हाव्या गावागावात बाल संरक्षण वातावरण निर्मिती व्हावी बालकांना योग्य न्याय मिळावा शासनाच्या योजनांचा लाभ बालकांना त्यांच्याकडे पोहोचण्यात यावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कामठी पंचायत समितीचे नायब तहसीलदार राजीव बमनोटे, गट विकास अधिकारी प्रदीप गायगोले, नवीन कामठी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे, बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण, संरक्षण अधिकारी विनोद शिंदे, संस्थेचे अध्यक्ष राजीव थोरात व त्यांचे सहकारी उपस्थित होते .कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडली असून कार्यशाळेचे संचालन प्रकाश तर आभार प्रदर्शन नीलिमा शेंडे यांनी केले कार्यशाळेला कामठी पंचायत समिती येथील पन्नास गावातील अंगणवाडी सेविका व काही पोलीस पाटील उपस्थित होते. कार्यशाळे करिता संस्था कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खासदार महोत्सव धार्मिक उधळपट्टी ? 26 नोव्हेंबर संविधान दिनी परित्राण?

Fri Nov 24 , 2023
नागपूर :- नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2023 पर्यंत 13 दिवसाचे खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे नागपुरात आयोजन केलेले आहे. हा पैसा जनतेचा असून या सार्वजनिक पैशावर कुठल्याही धर्माचा प्रचार-प्रसार करणारा कार्यक्रम होऊ नये. विशेष असे की हिंदू धर्माचाच प्रचार-प्रसार करण्यासाठी हनुमान चालीसा पठण, रुद्र पठण, श्रीसूक्त पठण, हरिपाठ पठण, विष्णुसहस्त्र पठण, गीता पठण, सुंदरकांड पठण, श्रीरामरक्षा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com