गोंदिया (प्रतिनिधी) :- गोंदिया शिक्षण संस्थाद्वारा संचालित येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात जागतिक ग्राहक संरक्षण दिनानिमित्त वाणिज्य विभागाच्या वतीने प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांच्या नेतृत्वाखाली कार्यशाळा घेण्यात आली.
गोंदिया शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक प्रफुल पटेल, अध्यक्षा वर्षा पटेल, सचिव राजेंद्र जैन, संचालक निखिल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. शारदा महाजन होत्या. प्रमुख अतिथी म्हणून वाणिज्य विभागप्रमुख डॉ. राकेश खंडेलवाल, स्टेट बँक ऑफ इंडियाचे नीरज मेश्राम, एरिया मॅनेजर नीरज गुप्ता, अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे डॉ. एस यू खान उपस्थित होते. बँकेचे व्यवहार करताना फसवणूक होऊ नये, ग्राहकांनी कशा प्रकारे काळजी घ्यावी व कोणते कौशल्य आत्मसात करावे, यावर नीरज मेश्राम यांनी मार्गदर्शन केले. नीरज गुप्ता यांनी बँकेच्या कार्यप्रणालीची सविस्तर माहिती दिली. ग्राहकांचे अधिकार आणि जबाबदारी यावर प्राचार्य डॉ. महाजन यांनी मार्गदर्शन केले. डॉ. एस यू खान यांनी पारंपरिक आणि आधुनिक बँक यातील फरक समजावून सांगितला.
कार्यशाळेचे संचालन अनुष्का शर्मा, प्रास्ताविक डॉ. राकेश खंडेलवाल तर आभार डॉ. रवींद्र मोहतुरे यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ. सरिता उदापुरकर, डॉ. भावेश जसानी, डॉ. खुशबू होतचंदानी, विक्रम प्रिथ्यांनी आणि वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.