संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यात तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय कामठी अंतर्गत राष्ट्रीय कृष्ठरोग कार्यक्रमा अंतर्गत ‘स्पर्श कृष्ठरोग जनजागृती अभियान’राबविण्यात येणार आहे.त्यानुसार 12 फेब्रुवारीला कामठी पंचायत समिती सभागृहात तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुरेश मोटे यांच्या अध्यक्षतेखाली कामठी तालुक्यातील खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांची कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेला त्वचारोग तज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉ सबा पठाण यांनी मार्गदर्शन केले तर तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुरेश मोटे यांनी उपस्थित खाजगी व्यावसायिकांना त्यांच्याकडे येणाऱ्या कृष्ठरोग संशयित रुग्णांना शासकीय रुग्णालयात संदर्भित करून कृष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमात संसर्गाची साखळी खंडित करण्यात सहकार्य करण्याचे आवाहन केले.तसेच कृष्ठरोग तंत्रज्ञ मनोहर येळे यांनी ‘संदर्भ’सेवा केंद्रात मिळणाऱ्या सेवाबाबत सविस्तर माहिती दिली.
याप्रसंगी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कामठीचे वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खाणुनी ,धिरेंद्र सोमकुवर,बलराज गेडाम,कमलेश गजभिये,सचिन राखडे आदी उपस्थित होते.