कामगारांना तालुकास्तरावर मिळणार गृहोपयोगी साहित्य

यवतमाळ :- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणारी मंडळाच्यावतीने जिल्ह्यातील नोंदीत जिवित पात्र बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तु संच वाटप करण्यात येत आहे. सदर वाटप आता संबंधित कंपनीकडून तालुकास्तरावर केले जाणार आहे. वाटपाची माहिती घेण्यासाठी संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहे.

संबंधित कंपनीकडून जिल्हा, तालुका स्तरावर नगर परिषद सभागृह, तालुका क्रिडा संकुल येथील ठिकाणी वाटप करण्याचे नियोजन दि. 16 ऑगस्ट पासून करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नोंदीत कामगारांची यादी तयार करण्यात आली आहे. सदर गृहपयोगी वस्तु संच नोंदीत जिवित पात्र बांधकाम कामगारांच्या कुटुंबातील एकाच व्यक्तीला साहित्य देण्यात येणार आहे.

बांधकाम कामगारांनी व्यवस्थापक मे.मफतलाल इंडस्ट्रीज, मुंबई यांच्या ९३२२६६२८१४, ९३२२६९०५७९, ९३२२६५९२६९, ९०२१८८०८२६ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून जिल्हा, तालुक्यातील नियोजित जागेवर ज्या दिनांकास बोलविण्यात येईल त्या दिवशी सदर ठिकाणी सकाळी १० वाजता स्वतः बांधकाम कामगाराने मंडळाचे संबंधित मूळ कागदपत्रासह उपस्थित राहावयाचे आहे. प्रथम बायोमॅट्रीक करुन घ्यावे व त़्यानंतर गृहपयोगी वस्तु संच प्राप्त करुन घ्यावयाचे आहे.

वरील क्रमांकावरुन संपर्क करण्यात येईल अशाच कामगारांनी गृहपयोगी वस्तु संच वाटप ठिकाणी उपस्थित रहावयाचे आहे. साहित्य घेण्यासाठी येतांना कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिल याची दक्षता घ्यावी. मंडळाची साहित्य वाटप योजना नि:शुल्क असुन त्रयस्त व्यक्तीद्वारे दिशाभूल, फसवणूक करण्यात येत असल्यास नजीकच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करावी, असे असे सरकारी कामगार अधिकारी यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तृतीयपंथीयांना योजनांचा लाभ देण्यासाठी शासनाच्या विविध विभागांनी पुढाकार घ्यावा - विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी

Tue Aug 13 , 2024
नागपूर :- नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये शासनाच्या विविध विभागांनी तृतीयपंथीयांना शासनाच्या योजना, सेवा-सुविधांचा लाभ देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचना आज विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्या. तसेच जिल्ह्यांमधून तृतीयपंथींय व्यक्ती आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधीचे नाव विभागातील तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळासाठी सूचविण्याचे निर्देश दिले. बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर विभागातील तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळाची बैठक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com