अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेकरीता महिला संघ घोषित

अमरावती :- महर्षि दयानंद विद्यापीठ, रोहतक येथे 26 डिसेंबर 2022 ते 1 जानेवारी 2023 दरम्यान होणा-या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेकरीता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा महिला संघ घोषित झाला असून या खेळाडूंचे प्रशिक्षण शिबीर क्रीडा प्रबोधिनी, शास्त्रीनगर, अकोला येथे 12 ते 21 डिसेंबर 2022 दरम्यान होणार आहे.

खेळाडूंमध्ये श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोलाची दीक्षा गवई, दिव्या बचेे व साक्षी गायधनी, पी.जी.टी.डी. शारीरिक शिक्षण, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची पूजा रहाटे, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीची दिव्या तायडे, नथमल गोयंका विधी महाविद्यालय, अकोलाची दीक्षा गोलाईत, श्री गाडगे महाराज महाविद्यालय, मूर्तिजापूरची  पुनम कैथवास, बी.एस.पटेल कला व वाणिज्य महाविद्यालय, पिंपळगाव काळेची तेजस्विनी पाखरे, श्रीमती एस.आर.मोहता महिला महाविद्यालय, खामगावची मुस्कान तडवी, अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण महाविद्यालय, अकोलाची  विधी रावल, गुलाम नबी आझाद महाविद्यालय, बार्शी टाकळीची  दिव्यानी जंजाळ, श्री एल.आर.टी. महाविद्यालय, अकोलाची प्रियांका खंडारे हिचा समावेश आहे.

सर्व खेळाडूंनी प्रशिक्षण शिबिराला उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अविनाश असनारे यांनी विद्यापीठाच्यावतीने केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत घनकचरा व्यवस्थापनाचा नेदरलँड कंपनीसोबत करार, भारतातील पहिला नावीन्यपूर्ण प्रकल्प नागपुरात

Mon Nov 14 , 2022
नागपूर :- भारतातील पहिला नावीन्यपूर्ण घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नागपूरमध्ये साकारत आहे. नेदरलँड येथील कंपनीसोबत नागपूर शहरातील घनकचरा प्रक्रिया व व्यवस्थापनासंदर्भातील एक महत्वपूर्ण बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज नागपूर येथे झाली. नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात नेदरलँड येथील एसयुएसबीडीई (Sustainable Business Development) कंपनीचे अध्यक्ष जॉप व्हीनेनबॉस, आमदार प्रवीण दटके, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. व अन्य अधिकाऱ्यांशी आज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com