अरोली :- तारसा – बाबदेव जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत येत असलेल्या माथनी येथील हनुमान मंदिर जवळ उद्या 22 जानेवारी बुधवारला दुपारी बारा वाजता महिला मेळावा व हळदीकुंकू समारंभ चे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्याला माथनी, सुकडी, चेहडी, पावडदौना, वांजरा, मोहखेडी येथील सर्व महिलांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या समारंभाच्या लाभ घ्यावा असे आव्हान माजी जिल्हा परिषद सदस्य भारती देवेंद्र गोडबोले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या स्टेटसवर पोस्ट टाकून केले आहे.