यवतमाळ :- महिलांच्या तक्रार निवारणासाठी सोमवारी दि. 17 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या महिला लोकशाही दिनी जिल्ह्यातील तक्रारग्रस्त महिलांनी तक्रारी मांडव्यात.
तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो. महिलांनी प्रथम या लोकशाही दिनात तक्रार दाखल करावी. सदर तक्रारीवर योग्य कारवाई झाली नसल्यास जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात तक्रार सादर करावे. न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेला अर्ज, सेवाविषयक, आस्थापनाविषयक बाबी आणि वैयक्तिक तक्रार किंवा निवेदने स्विकारले जाणार नाहीत, याची महिलांनी नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.