नागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना आयुक्तालय कार्यालयामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला आयुक्त शांतनु गोयल, सहायक आयुक्त अनिल किटे, सहायक संचालक प्रशांत ढाबरे, लेखाधिकारी अश्विनी पात्रीकर, नायब तहसिलदार शिला भुसारी, विस्तार अधिकारी सुनिता भोले यांची उपस्थित होती. कार्यक्रमाच्या सुरूवातीला आयुक्त शांतनु गोयल यांनी सर्व महिलांना गुलाबाचे रोपटे देवून स्वागत केले. महिला सक्षमीकरणासाठी समाज सुधारक यांनी फार मोठे योगदान दिले आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या सारख्या समाजसुधारकांची महिला सक्षमीकणास मोलाची भूमिका पार पाडली आहे असे मत आयुक्त शांतनु गोयल यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन रेश्मा गुल्हाने यांनी केले तर आभार प्रशांत ढोबरे यांनी मानले. कार्यक्रमाला महिला अधिकारी व कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.