– जानकीदेवी बजाज पुरस्काराने वीणा उपाध्याय राज्यपालांच्या हस्ते सन्मानित
मुंबई :- आयएमसी चेंबर महिला विभागातर्फे देण्यात येणारा 31 वा. ‘जानकीदेवी बजाज पुरस्कार’ श्रीजनी फाउंडेशनच्या संस्थापिका वीणा उपाध्याय यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
उपाध्याय यांनी बावनबुटी साडी विणणाऱ्या महिला कारागिरांना प्रोत्साहन देऊन या कलेचे पुनरुज्जीवन करताना बिहारमधील ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविल्याने हा पुरस्कार मिळत आहे.
आयएमसी सभागृहात मंगळवारी झालेल्या या कार्यक्रमाला आयएमसी महिला विभागाच्या अध्यक्ष ज्योती दोशी, उपाध्यक्ष राज्यलक्ष्मी राव, जानकीदेवी बजाज पुरस्कार समितीच्या अध्यक्षा नयनतारा जैन, उद्योगपती शेखर बजाज, नीरज बजाज तसेच बजाज कुटुंबातील सदस्य व निमंत्रित उपस्थित होते.