संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावत प्रत्येक क्षेत्रात यशाचे शिखर गाठत आहे.त्याचप्रमाणे आता महिलांनी उद्योग व्यवसायात मोठ्या प्रमाणात पुढे येण्याची गरज आहे तर महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महिला सक्षमीकरण करण्यासाठी लवकरच कामठी शहरात 2 गारमेंट क्लस्टर उभारणार असल्याचे मौलिक प्रतिपादन विधानपरिषद सदस्य आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगर परिषद कामठी अंतर्गत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान च्या वतीने गंज के बालाजी सभागृहात आयोजित महिला बचत गटांना शिलाई वाटप व बचतगटांना कर्ज वाटप कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.याप्रसंगी आमदार टेकचंद सावरकर,माजी जी प सदस्य अनिल निधान, भाजप पदाधिकारी गण अजय अग्रवाल,मनीष वाजपेयी, लाला खंडेलवाल,माजी नगरसेवक संजय कनोजिया,माजी नगरसेवक कपिल गायधने, चंद्रशेखर तुप्पट, माजी नगरसेवक प्रतीक पडोळे लालसिंग यादव,प्रमोद वर्णम,माजी सरपंच बंडू कापसे, नगर परिषद दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभागाचे कर्मचारी प्रदीप तांबे,विशाल गजभिये आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की प्रधानमंत्री खनिज कल्याण योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यातील व नागपूर महापालिका, नगरपंचायत/ नगरपरिषद कार्यक्षेत्रातील सर्व अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा स्वयंसेविका, आशा गटप्रवर्तक यांना आणि ८ तालुक्यातील नगरपरिषद / नगरपालिका कार्यक्षेत्रातील १०००० विद्यार्थ्यांना मोफत सायकल वितरीत करण्यासाठी तब्बल ९,८९,५५,००० रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. याचा लाभ नागपूर जिल्ह्यातील अनेक अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा स्वयंसेविका, आशा गटप्रवर्तक महिलांसह दहा हजार विद्यार्थ्यांना देखील होणार आहे. याप्रसंगी कामठी नगर परिषद अंतर्गत कार्यरत एकूण 125 महिला बचत गट सदस्य यांना प्रत्येकी एक बचत गट प्रमाणे शिलाई मशीन वाटप करण्यात आली दरम्यान बचत गटातील सदस्यांना अधिक रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता प्रशिक्षण केंद्र व बचत भवन इमारत करिता निधी व जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले तसेच एकूण 20 महिला बचतगटांना पन्नास लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले.याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार टेकचंद सावरकर यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या सक्षमीकरण साठी सुरू करण्यात आली असून आमची सत्ता आल्यास ही योजना बंद करणार असल्याच्या लाडक्या बहिण्याच्या विरोधकांना धडा शिकवा असे मत व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून बचत गट सदस्य वस्ती स्तर संघ सदस्य महिलांची मोठ्या संख्येत गर्दी होती.कार्यक्रमाचे आयोजन नगर परिषद कामठी दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभाग मार्फत मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या मार्फत करण्यात आले असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कर्मचारी प्रदीप तांबे, विशाल गजभिये यांनी मोलाची भूमिका साकारली. कार्यक्रमाचे आभार उडान शहर स्तर संघ चे अध्यक्ष माधुरी ताई गजभिये यांनी मानले .