एक दिवसाची महिला पी आय ठरली महिला पोलीस उपनिरीक्षक गीता रासकर व माया अमृ

– संदीप कांबळे,कामठी

कामठी ता प्र 8 – महिला पोलीस कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या संकल्पनेतून 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त ‘पोलीस दलावर महिला पोलिसांचे कंट्रोल’या अभिनव उपक्रमांतर्गत स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे एक दिवसाचा कारभार एक दिवसाची पी आय म्हणून महिला पोलीस उपनिरीक्षक गीता रासकर तर जुनी कामठी पोलीस स्टेशन ला महिला पोलिस कर्मचारी माया अमृ यांना पदभार देण्यात आला.यानुसार आज नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिवसा पाळी अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक गीता रासकर यासह असलेल्या महिला पोलिस कर्मचारी तसेच जुनी कामठी पोलीस स्टेशन ला महिला पोलीस कर्मचारी माया अमृ यासह मनीषा मानकर,ज्योतो सहारे,मनीषा ढोके, रुपाली साकोळे, सुदर्शना, वैशाली उके यासह आदी महिलां पोलीसानी पोलीस स्टेशन चा एक दिवसीय दैनंदिन कामकाज सुव्यवस्थित पार पडला असून आज या जुनी व नवीन कामठी पोलीस स्टेशन ला महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे कंट्रोल आले होते.

याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक केरबा माकने यांच्या शुभ हस्ते महिला कर्मचाऱ्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.दरम्यान पोलीस उपनिरीक्षक केरबा उर्फ आकाश माकने यांनी केलेल्या मार्गदर्शनातून भारतीय संस्कृतीमध्ये महिलेला देवीचे स्थान असून त्यांना पूजनीय ठरविले आहे तेव्हा समाजामध्ये महिलांचा आदर सम्मान वाढलेच पाहिजे व यादृष्टीने प्रयत्न करणाऱ्यांवर भर दिला पाहिजे तसेच समाजातील दलित ,आर्थिकदृष्ट्या कमकुवत, निराधार महिलांना आधाराचे स्थान मिळावे यादृष्टीने समाजाने लक्ष देण्याची गरज आहे .कार्यक्रमाचे संचालन सूचित गजभिये तर आभार शैलेश यादव यांनी मानले

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कामठी पंचायत समिती कार्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

Tue Mar 8 , 2022
– संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 8:-भारतात मुंबई येथे जागतिक महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com