‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ बाबत बाईक रॅलीमधून जनजागृती होईल महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे प्रतिपादन

मुंबई :-  यशस्विनी बाईक रॅलीच्या माध्यमातून बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान बाबत जनजागृती करण्याचे कार्य होत असल्याचे प्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज येथे केले.

गेट वे ऑफ इंडिया येथे केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) यांच्या यशस्व‍िनी बाईक रॅलीस महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते झेंडा दाखूवन पुढील प्रवासास शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महानिरीक्षक पी.रणपिसे, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर आदी उपस्थित होते.

‘बेटी बचाव बेटी पढाओ हा संदेश घेऊन केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) च्या 75 माहिला जवान 15 राज्यामधून आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील 121 जिल्ह्यातून अंदाजे 10 हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. 3 ते 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीत या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीनगर, शिलाँग, कन्याकुमारी ते एकतानगर गुजरात असा प्रवास या रॅलीच्या माध्यामातून होणार आहे.

या रॅलीचे महाराष्ट्र राज्यात सोलापूर येथे आगमन झाले. मुंबई येथे ही रॅली आली आहे. पुढील प्रवास करण्यासाठी शुभेच्छा देण्याकरिता गेट वे ऑफ इंडिया येथे केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) आणि माहिला व बाल विकास विभागांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महिला व बाल विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेंतर्गत कु.जीविका यादव, युक्ता कांबळे (चेंबूर), कस्तुरी देसाई (प्रभादेवी), इशान्वी गुंडाळे (भायखळा) आणि ज्ञानदा तेरवणकर यांना प्रातिनिधीक स्वरुपात धनादेशाचे वाटप माहिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

प्रास्ताविक केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महानिरीक्षक पी.रणपिसे यांनी तर सूत्रसंचालन जाई वैशंपायन यांनी केले. यावेळी केंद्रीय राखीव पोलिस दलातील पुरुष व माहिला जवान यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आता नेत्यांच्या नाही कार्यकर्त्यांच्या निर्णयावर राजकारणाची दिशा ठरणार - बागडे 

Wed Oct 25 , 2023
नागपूर :- तो काळ गेला, नेते म्हणतील ती पूर्व दिशा आता चळवळीतील कार्यकर्ते जे राजकीय निर्णय घेतील तो समाज मान्य करेल कारण समाजाची धुरा चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर आहे असे प्रतिपादन आंविमो आणि आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केले. ते आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा च्यावतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार सभागृहात आयोजित राज्यस्तरीय राजकीय निर्णय मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून बोलत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!