पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले चौकशीचे आदेश

मुंबई :- पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने तनिषा भिसे या भगिनीला आपला प्राण गमवावा लागला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीद्वारे करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबतची संपूर्ण माहिती घेतली आहे. आरोग्य विभागाने तातडीने, पारदर्शक आणि निष्पक्षपणे चौकशी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णालय प्रशासनाने माध्यमांसमोर त्यांचे म्हणणे मांडले असले, तरी शासन या प्रकरणाचा सर्व संबंधित घटकांची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करेल. या घटनेबाबत आंदोलन करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संघटनांच्या भावना शासनाने समजून घेतल्या आहेत. चौकशीच्या निष्कर्षानुसार दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. तसेच अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. सर्व नागरिकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

१६ व्या वित्त आयोगाच्या दौऱ्याच्या तयारीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा

Fri Apr 4 , 2025
मुंबई :- सोळावा वित्त आयोग येत्या ८ व ९ मे , २०२५ रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर यंत्रणेमार्फत करण्यात येत असलेल्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली १६ व्या वित्त आयोगाच्या दौ-याच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, मुख्य सचिव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!