संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- मध्य प्रदेश येथुन विट भट्यावर काम करण्यास आलेल्या महिलेचा डुमरी पेट्रोल जव़ळ रस्ता पार करताना कन्हान कडुन मनसर कडे जाणा-या ट्रक ने जोरदार धडक मारल्याने झालेल्या अपघाात महिलेचा पाय तुटुन गंभीर जख्मी झालेल्या महिलेचा उपचारास नेताना मुत्यु झाला. कन्हान पोलीसानी आरोपी ट्रक चालका विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
अशोक मकरध्वज मरकाम वय ३५ वर्षे रा. गोहरा भंडेरी ता. बईहर जि. बालाघाट (मप्र) हा आई व पत्नी असे तिघे दिड महिन्या पहिले विटभट्टा मालक सतोष चौधरी मरारवाडी ता. रामटेक जिल्हा नागपुर यांचे कडे विटभट्टा मजुरीच्या कामाकरिता आले असुन तिघे काम करित होते. शनिवार (दि.२२) ला सकाळी ८ वाजता त्याची आई मिराबाई मकरध्वज मरकाम वय ५६ वर्ष ही डुमरी खुर्द पोस्ट खंडाळा ये़थील ओळ खीचे चंद्रभान टिकम यांची भेट घेण्याकरिता जातो म्हणुन निघुन आली. ती रामटेक वरून सरळ कन्हान ला जाऊन तेथुन ऑटोने डुमरी पेट्रोल पम्प सामोर दु१२ वाजता उतरून डुमरी गावात जाण्यास नागपुर जबलपुर महामार्ग पार करित असताना कन्हान कडुन येणारा ट्रक क्र. एमएच ४० बीएल २४४६ च्या चालका ने आपले वाहन निष्काळजीपणे भरधाव वेगाने चालवु न महिले ला जोरदार धडक मारल्याने महिला रोडवर पडल्यावर तिच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने तिचा एक पाय कमरे पासुन अलग होऊन गंभीर जख्मी झाल्याने तेथील लोकांनी पोलीसाना सुचना दिल्याने कन्हान पोस्टे चे आकाश सिरसाट घटनास्थळी पोहचु न लोकांच्या मदतीने तिला उपचाराकरिता शासकिय मेयो रूग्णालय नागपुर ला नेले असता डॉक्टरांनी तपा सुन तिचा मुत्यु झाल्याचे घोषित केले.
शनिवार (दि.२२) ला सायंकाळी ४ वाजता चंद्रभान टिकम हे मरारटोली रामटेक येथे अशोक मरकाम कडे जाऊन आई चा ट्रकने अपघात झाला असुन पोलीसानी बेलाविल्याचे सांगितल्याने दोघेही कन्हान पोलीस स्टेशन ला पोहचुन सायंकाळी ७ वाजता फिर्यादी मुलगा अशोक मरकाम यांने ट्रक चालका विरूध्द तक्रार दिल्याने कन्हान पोलीसानी थानेदार राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात आरोपी ट्रक चालक हरिचंद्र मोतीराम कोकोडे रा. भंडारबोडी ता रामटेक यांचे विरूध्द कलम १०६, २८१ बीएनएस व १८४ मोवाका अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे. रविवार (दि.२३) ला मिराबाई मरकाम च्या मृतदेहाची उत्तरिय तपासणी करून सायंकाळी अंतिम संस्कार करण्यात आला.