– प्रख्यात रामधाम येथे भव्य समारोह संपन्न
– सरपंच – सदस्यांचा सत्कार, महिलांना साड्यांचे वितरण
रामटेक –पर्यटन मित्र, सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा इतर काही उपाधींनी प्रसिद्धीझोतात असलेले चंद्रपाल चौकसे यांचा वाढदिवस समारोह काल दि. १ जानेवारीला मनसर येथील प्रख्यात रामधाम तिर्थक्षेत्र येथे मोठ्या उत्साहात व भव्य स्वरूपात पार पडला. यावेळी त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर अक्षरशः शुभेच्छांचा वर्षाव केला. मनसर येथील रामधाम येथे सकाळपासूनच क्षेत्रातील नागरीक, विविध महिला मंडळ, कार्यकर्ते व चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन आमदार सुनील केदार, अध्यक्षस्थानी सरपंच संघटनेचे अध्यक्ष दयाराम रॉय, तर प्रमुख पाहुणे म्हणुन चंद्रपाल चौकसे हे उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित विविध पदाधिकाऱ्यांनी आपले दोन शब्द व्यक्त करतांना चंद्रपाल चौकसे यांच्या जिवनावर व त्यांनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकत त्यांचे तोंडभरून कौतुक केले. माजी मंत्री तथा आमदार सुनील केदार यांनी ‘ लोकांसोबत जुळुन राहाण्याचा चंद्रपाल चौकसे यांचा स्वभाव आहे ‘ असे म्हणत चौकसेंचे भरभरून कौतुक केले. यानंतर चंद्रपाल चौकसे यांनी आपल्या जिवनप्रवासाबद्दल सांगत शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या नागरीकांचे आभार व्यक्त केले. यानंतर चंद्रपाल चौकसे यांनी केक कापला यावेळी त्यांच्या पत्नी त्यांच्यासोबत होत्या. यानंतर महिला – पुरुषांचे जत्थे च्या जत्थे पुष्पगुच्छ, हार तथा शाल व श्रीफळ घेऊन मंचावर गेले व चौकसेंचा सत्कार केला. याप्रसंगी नुकतेच निवडुन आलेल्या नवनिर्वाचीत सरपंच – सदस्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थीत महिलांना चौकसे यांचेकडुन साड्या भेट म्हणुन देण्यात आल्या. यावेळी उपस्थितांमध्ये जि.प. अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, उपाध्यक्ष कुंदा राऊत, माजी जि.प. अध्यक्षा रश्मी बर्वे, जि.प. सभापती अवंतिका लेकुरवाळे, कृ.उ.बा.स. सभापती हुकुमचंद आमधरे, माजी जि.प. उपाध्यक्ष शरद डोणेकर, सचिन किरपान, सरपंच उमेश भांडारकर, मोहन कोठेकर, स्थानिक पत्रकार मंडळी तथा नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.