हिवाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित

नागपूर :- विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन सोमवार, दि. 3 मार्च 2025 रोजी विधानभवन, मुंबई येथे होणार असल्याची घोषणा विधान परिषदेत सभापती प्रा. राम शिंदे यांनी केली.

विधान परिषदेत प्रत्यक्षात 36 तास कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज 6 तास झाले. या अधिवेशनात सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती 87.76 टक्के होती, तर एकूण सरासरी उपस्थिती ही 79.30 टक्के इतकी होती.

विधान परिषदेत पुर्न:स्थापित 4 शासकीय विधेयके मांडण्यात आली असून 4 विधेयके संमत झाली. विधानसभेने परित करून विधानपरिषदेत आलेली विधेयके 9 आहेत. यामध्ये शिफारशी शिवाय विधानसभेला परत पाठवलेली विधेयके 4 आहेत. परिषदेत 4 शोक प्रस्ताव मांडण्यात आले. अधिवेशनात सहकार्य केल्याबद्दल सभापती प्रा शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

हिवाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित

Sun Dec 22 , 2024
नागपूर :- विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन सोमवार दि. 3 मार्च 2025 रोजी विधानभवन, मुंबई येथे होणार असल्याची घोषणा विधानसभेत अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केली. विधानसभेत प्रत्यक्षात 46 तास 26 मिनिटे कामकाज विधानसभेत प्रत्यक्षात 46 तास 26 मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज 7 तास 44 मिनिटे झाले. या अधिवेशनात विधानसभेत सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!