ऐका ऐका हो मुख्यमंत्री, कृषिमंत्री तुम्हीच वाजवली होती “अच्छे दिनाची वाजंत्री ” पण माती मोल भावाने विकल्या गेली आमची संत्री .
नऊ महिने सांभाळ करून पिकवली होती संत्री, पण दलालांचा बाजारात मातीमोल भावाने विकल्या गेली संत्री.
आता कसे वाजेल माझ्या मुलीच्या लग्नात वाजंत्री,मातीमोल भावाने विकल्या गेली संत्री.
निरोगी आरोग्याचा महामंत्र रोज खा संत्र ह्या ब्रीद वाक्याची घसा कोरडा होई पर्यंत वाजवली घंटी,पण मातीमोल भावाने विकल्या गेली संत्री.
तुम्ही आहात एवढे मोठे महामंत्री मग का विकल्या गेली मातीमोल भावाने आमची संत्री.
आम्ही विचार करू या पुढे पिकवायची का नाही संत्री ,मग तूटेल सगळ्यांची तंद्री.
आता माझ्या मोबाईल वर वाजेल सावकार व बँक वाल्याची घंटी ,काय उत्तर देऊ हो महामंत्री ,मातीमोल भावाने विकल्या गेली माझी संत्री