संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- येरखेड्याच्या सर्वांगीण विकासाकरिता सदैव सहकार्य करणार असल्याचे मत कामठी – मौदा विधानसभा क्षेत्राचे आमदार टेकचंद सावरकर यांनी ग्रामपंचायत येरखेडा वार्ड क्रमांक तीन येथील बागडोर नाला संरक्षण भिंत व नालावरील पुलाचे लोकार्पण, सिमेंट रोडचे भूमिपूजन प्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले आमदार टेकचंद सावरकर व प्रदेश भाजप अध्यक्ष व विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्थानिक निधीतून मंजूर बागडोर नाला संरक्षण भिंती करिता मंजूर एक करोड 76 लाख रुपये, तेलीपुरा ते कन्टोन्मेंट बागडोर नाल्यावर 55 लाख खर्च करून उभारण्यात आल्या पुलाचे लोकार्पण व तेलीपुरा ते नागपूर जबलपूर राष्ट्रीय अप्रोच मार्गाचे सिमेंटिकरण बांधकामाचे भूमिपूजन आमदार टेकचंद सावरकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी भाजप युवा मोर्चा प्रदेश पदाधिकारी संकेत बावनकुळे, जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे ,कामठी तालुका भाजप अध्यक्ष व माजी सभापती उमेश रडके ,चेतन खडसे, सुनील खांनवानी ,माजी उपसभापती देवेंद्र गवते ,राजेश पिपरेवाल, माजी सरपंच मंगला कारेर्मोरे, मनीष कारेमोरे, उपसरपंच मंदा महल्ले ,ग्रामपंचायत सदस्य गजानन तिरपुडे, अनिल भोयर, कुलदीप पाटील, आचल तिरपुडे ,नरेश मोहबे, जयश्री धिवले, सुमेध दुपारे, तरुण घडले, प्रज्वल पोटभरे, पुरूषोत्तम पोटभरे ,राजकिरण बर्वे ,उमेश महाले, प्रदीप सपाटे, प्रशांत चकोले, स्वप्नील फुकटे, सुषमा राकडे, वंदना भस्मे, मुक्ता कारेर्मोरे ,वनिता नाटकर ,जया भस्मे उपस्थित होते.