नागपूर: २६ डिसेंबर – आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन नागपूर यांचे दुसरे अधिवेशन नागपुरात पार पडले. या अधिवेशनाच्या निमित्ताने कॉ.आनंदी अवघडे अध्यक्षा महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन यांनी आशा व गटप्रवर्तक यात गेले. १० वर्ष केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान या अभियानात काम करत आहेत केंद्र सरकारने त्यांना कमीत कमी मोबदला व जास्तीत जास्त काम करून घेण्याचे धोरण अवलंबिले आहे .सी आय टी यू देश पातळीवर आशा व गटप्रवर्तक यांना CITU च्या झेंड्याखाली एकत्र करून केंद्र सरकारने यांना कायम कर्मचारी केले पाहिजे व सरकारी कर्मचाऱ्यांच्या सर्व सुविधा व अधिकार दिले पाहिजे यासाठी देशव्यापी लढा करत आहे याची सुरुवात येत्या 3 फेब्रुवारीला दिल्ली जंतर मंतर येथे आशा व गटप्रवर्तक यांचा प्रचंड मोर्चा काढण्यात येणार आहे. आशा व गटप्रवर्तक यांना कायम कर्मचारी करा हा इशारा केंद्र सरकारला देत आहे सरकार जोपर्यंत हे करत नाही तोपर्यंत सी आय टी यु देशभरात हा लढा जास्तीत जास्त आक्रमकपणे चालू ठेवणार आहे. तसेच 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी देशभरात सर्व कामगार संघटनांच्यावतीने देशातील सर्व क्षेत्रातील कामगारांचा देशव्यापी संप होत आहे. या संपातही आशा व गटप्रवर्तक 100% सहभागी होऊन रस्त्यावर उतरतील असे साताराच्या कॉम्रेड आनंदी अवघडे यांनी सांगितले. या जिल्हा अधिवेशनाला शुभेच्छा देण्याकरता LIC चे कॉ.रमेश पाटणे, CITU तर्फे कॉ.वडणेरकर, आंगनवाडीचे कॉ. विठ्ठल जूनघरे, जिल्हा DCM मयुरी साळवे, कॉ.आशू सक्सेना, मंगला जूनघरे, कॉ.अरुण लाटकर, प्रा. राहुल मुन उपस्थित होते.अधिवेशनाचे उद्घाटन रज्जु परिपगार यांनी केले. वक्त्यांनी केंद्र सरकारच्या देश विघातक धोरणांचा समाचार घेतला. या जिल्हा अधिवेशनात आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन नागपूर ची ५५ महिलांची नवीन जिल्हा कमिटी निवडण्यात आली. अध्यक्ष म्हणून कॉम्रेड राजेंद्र साठे व महासचिव म्हणून कॉम्रेड प्रीती मेश्राम, शहर सचिव कॉ.रंजना पौनीकर यांची फेरनिवड करण्यात आली व खजिनदार म्हणून कॉ.अंजू चोपडे व लक्ष्मी कोत्तेजवार यांची निवड करण्यात आली. येत्या काळात कायम कर्मचारी करण्याची लढाई मजबूत करण्याचे करण्याचे घोषित करून हे अधिवेशन संपन्न झाले.
आशा व गटप्रवर्तक यांना कायम कर्मचारी करणार.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com