महाराष्ट्रात आज दलित सुरक्षित का नाहीत ? माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे सवाल

– अक्षय भालेराव यांच्या कुटुंबीयास तातडीने 50 लाखाची अर्थिक मदतीची मागणी

नागपूर :- एकीकडे महाराष्ट्र राज्य शिवराज्यभिषेक साजरा करत असताना सर्व जाती धर्मांना समान वागणूक देणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या या राज्यात नांदेड जिल्ह्यातील बोंढार येथील अक्षय भालेराव निर्घृण हत्या प्रकरण काळीज पिळवटून टाकणारे आहे. या राज्यात दलित, वंचित समाज सुरक्षित आहे काय? असा खडा सवाल विचारत सदर प्रकरणी SIT मार्फत निष्पक्ष तपास करुन अक्षय भालेराव यांच्या कुटुंबीयास तातडीने 50 लाखाची अर्थिक मदतीची मागणी काँग्रेसचे जेष्ठ नेते व राज्याचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली.

केवळ दलित आहे म्हणून आणि गावात भीम जयंती साजरी केली म्हणून ज्या पद्धतीने खंजर भोसकून त्याचा निर्घृण खून करण्यात आला, त्याच्या भावाला आणि आईला मारण्याचा प्रयत्न झाला ही घटना या राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे काढणारी आहे.

या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत पुरोगामी महाराष्ट्र म्हणवून घेणाऱ्या या राज्यात हे चाललेय तरी काय ?? छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या या महाराष्ट्रात आज दलित सुरक्षित का नाहीत ?? असा प्रश्न यावेळी डॉ. राऊत यांनी पत्रात मुख्यमंत्र्यांना केला.

अट्रोसिटी चा कायदा कठोर आहे मात्र अट्रोसिटी ऍक्ट ची प्रभावी व निष्पक्ष अंमलबजावणी होत नाही. अजूनही नियम १६ अन्वये मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत झाली नाही, बैठका नाहीत. राज्य अनुसूचित जाती, जमाती आयोग कार्यरत नाही. यापूर्वी अट्रोसिटीच्या घटनेत हत्या, खून, मृत्यू झाला, अशा जवळपास ६३० पीडित कुटुंबाच्या अवलंबितांना अजूनही नोकरी मिळाली नाही. एकीकडे कंत्राटी पद्धतीवर बाह्य पद्धतीने भरती होत असताना अट्रोसिटी पीडित मात्र दुर्लक्षित आहेत. त्यांचे पुनर्वसन करण्यात आलेले नाही. वेळेवर आर्थिक मदत मिळत नाही. योग्य तपास होत नाही आणि मुदतीत निर्णय होत नाही. त्यामुळे कायद्यातील तरतुदी प्रामाणिकपणे व प्रभावीपणे राबविण्याची गरज निर्माण झाली आहे, असेही पत्रात नमूद आहे.

अक्षय भालेराव खून प्रकरणी स्वतः जातीने लक्ष घालून पीडित कुटुंबास भेट द्यावी आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. अजुनपावेतो घटना स्थळी मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री यांनी पिडीत कूटूंब व गांवकरी यांना भेट दिली नाही जे अपेक्षीत आहे.

सदर प्रकरण हे मानवतेला काळीमा फासणारे असून SIT मार्फत निष्पक्ष तपासाची मागणी, अक्षय भालेराव यांच्या कुटुंबीयास तातडीने 50 लाखाची अर्थिक मदत देण्यात यावी, अक्षय भालेरावचा जखमी भाऊ आकाश भालेराव यास शासकीय नोकरी देण्यात यावी, अक्षय भालेराव निर्घुन हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, या प्रकरणात सरकारी वकीलाची नियुक्ती करण्यात यावी, अक्षय भालेराव यांच्या कुटुंबास तात्काळ कायमस्वरुपी पोलीस संरक्षण देण्यात यावे आणि बोंढार गावातील सर्व बौद्ध समाजाच्या संरक्षणासाठी पोलीस चौकीची स्थापना करण्याची मागणी डॉ. नितीन राऊत यांनी पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.

डॉ. नितीन राऊत यांच्या प्रमुख मागण्या

1) या प्रकरणाचा निष्पक्ष तपास SIT लावून त्यांचे मार्फत तातडीने करण्यात यावा.

2) अक्षय भालेराव यांच्या कुटुंबीयास तातडीने 50 लाखाची अर्थिक मदत देण्यात यावी.

3) अक्षय भालेरावचा जखमी भाऊ आकाश भालेराव यास शासकीय नोकरी देण्यात यावी.

4) अक्षय भालेराव निर्घुन हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे.

5) या प्रकरणात सरकारी वकीलाची नियुक्ती करण्यात यावी.

6) अक्षय भालेराव यांच्या कुटुंबास तात्काळ कायमस्वरुपी पोलीस संरक्षण देण्यात यावे.

7) बोंढार गावातील सर्व बौद्ध समाजाच्या संरक्षणासाठी पोलीस चौकीची स्थापना करावी.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महा कार्ड का सर्वाधिक उपयोगकर्ता अनुराग शर्मा रहे, महा मेट्रो ने किया सत्कार

Sat Jun 10 , 2023
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (नागपुर मेट्रो रेल परियोजना) नागपुर :- देश में सभी स्तरपर कैशलेस पेमेंट को प्रोत्साहन दिया जा रहा, नागपुर मेट्रो के कॉमन मोबिलिटी कार्ड की उपयोग मी भी दिन-ब-दिन बढोतरी हो रही है ! विद्यार्थी नौकरीपेशा तथा रोजाना मेट्रो ट्रेन से यात्रा करने वाले मेट्रो यात्रियों की सुविधा के लिए महामेट्रो की ओर से ‘महाकार्ड ‘उपलब्ध […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!