महाकारूनिक तथागत गौतम बुद्ध प्रतिकृतीच्या अवहेलनाला कोण जवाबदार ?

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-जयस्तंभ चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराची दुरावस्था

कामठी :- दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्ध धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त हजारोच्या संख्येतील आंबेडकरी अनुयायांनी जयस्तंभ चौक स्थित परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन वाहायला येणार असून या पुतळा परिसरात असलेली दुरावस्था तसेच या परिसरात स्थापित असलेल्या महाकारूनिक तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिकृतीलगत नळाचे वाहते पाणी जमा होत असल्याने होत असलेल्या अवहेलना व दुरावस्थेमुळे येथील अनुयायांच्या भावना दुखावल्या जात असल्याने उपस्थित अनुयायांनी स्थानिक नगर परिषद प्रशासना विरोधात नाराजगीचा सूर वाहत या पुतळा परीसराची दुरावस्था केव्हा दूर होणार तसेच तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिकृतीची अवहेलना केव्हा थांबणार अशी विचारणा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सौंदर्यीकरण समिती जयस्तंभ चौक कामठी चे समस्त पदाधिकारी सदस्यगणासह येथील जागरूक नागरिक करीत आहेत.

जयस्तंभ चौक स्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराच्या सौंदर्यीकरण करण्यासाठी सन 2012 मध्ये दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत लाखो रुपयाच्या शासकीय निधीतून परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात आले होते ज्यामध्ये या परिसरात कलाकृती सह नक्षीकाम करण्यात आले होते ज्यामध्ये पाण्याचे हौद आदींची व्यवस्था करून परिसर सुशोभित करण्यात आले होते मात्र स्थानिक नगर परिषद प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षित पणामुळे या परिसरात दुरावस्था निर्माण झाली आहे.या परिसरातील निर्मित करण्यात आलेले नक्षीकाम, पाण्याचे हौद हे नाहीसे झाले आहेत, लाकडी कठडे तुटलेले आहेत तसेच या परिसराच्या कडेला बसून काही मद्यपी मद्य प्राशन करून दारूच्या खाली बॉटल या परिसरात फेकत असल्यामुळे एक प्रकारे समस्त अनुयायांच्या भावना जुडलेल्या या श्रद्धेय परिसराची विटंबना करण्याचा प्रकार दिवसेंदिवस होत असुनही स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष पुरवून बघ्याची भूमिका घेत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पायथ्याच्या भाग हा एकदम कमी असल्याने माल्यार्पण करायला गेलेल्या अनुयायीना तोल जाऊन खाली पडतो की काय ! अशी स्थिती निर्माण होते .वास्तविकता या पुतळा परिसराची सुव्यवस्था करणे हे स्थानिक प्रशासनाची जवाबदारी आहे यासंदर्भात डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सौंदर्यीकरण समितीच्या माध्यमातून पुढाकार घेत नगर परिषद प्रशासनाला सदर पदीसराच्या सौंदर्यीकरणाची मागणी करण्यात आली तसेच नुकतेच संपन्न झालेल्या कामठी शहर नगर विकास कृती समितीच्या आंदोलनातून सुद्धा मागणी करण्यात आली मात्र स्थानिक प्रशासन ही जवाबदारी प्रमाणिकतेने पार पडत नसल्याने या परिसराची दुरावस्था कायम आहे. तर यासंदर्भात सदर परिसराच्या सौंदर्यीकरण संदर्भात नकाशा वगैरे मंजूर करण्यात आले असून लवकरच प्रशासकीय मान्यता घेऊन शासनाकडून दीड कोटिच्या निधीची तरतुद करण्यात येणार असून या मंजूर निधीतून जयस्तंभ चौक परिसर सह डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात येईल असे आश्वासित करण्यात आले आहे मात्र या परिसरात असलेल्या नळातुन दररोज वाहणारे पाणी तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिकृतीच्या पायथ्याशी साचत असल्याने या परिसराची एक प्रकारे सर्रास अवहेलना होत आहे यासंदर्भात नगर परिषद प्रशासनाला अवगत करून योग्य तो मार्ग काढून ही अवहेलना थांबविण्यात यावी असे निवेदित करण्यात आले मात्र भावनाशून्य असलेले येथील कामठी नगर परिषद प्रशासन याकडे अक्षम्य दुर्लक्ष पुरवून दुखावलेल्या भावनेशी सर्रास खेळ खेळत आहे .ज्यामुळे येथील अनुयायांत संतापाची लाट पसरली आहे तेव्हा राग अनावर झाल्यास संतापाची कुठलीही तमा न बाळगता नगर परिषद प्रशासन विरोधातील परिस्थिती अवाक्याबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा अशा परिस्थितीला कामठी नगर परिषदने आव्हान न देता सदर परिसरात होणाऱ्या दुरावस्था तसेच अवहेलना परिस्थितीचा प्रश्न त्वरित मार्गी लावावे अशी मागणी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सौंदर्यीकरण समितीचे प्रमोद खोब्रागडे, राजेश गजभिये, गीतेश सुखदेवें, विकास रंगारी, दिपंकर गणवीर, उदास बन्सोड, तिलक गजभिये,कोमल लेंढारे,आशिष मेश्राम,आनंद गेडाम, सुमित गेडाम, मंगेश खांडेकर,राजन मेश्राम, मनोज रंगारी, रायभान गजभिये आदींनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘परवडणारी घरे’ प्रकल्पांना सर्वतोपरी मदत - महसूल मंत्री विखे-पाटील

Mon Oct 9 , 2023
– होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पोचा समारोप नागपूर :- सर्वांसाठी घरे या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील योजनेचे अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ‘परवडणारी घरे’ यासारखे प्रकल्प प्राधान्याने राबविणे आवश्यक असून त्यासाठी प्राधान्य, सवलत व सर्वतोपरी मदत करण्यास शासन तत्पर राहील, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल- (नरेडको) यांच्यावतीने रेशीमबाग मैदानावर आयोजित तीन दिवसीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com