संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- शासनाच्या वतीने अंत्योदय व अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत धान्य वितरीत करण्यात येत आहे.परंतु कामठी तालुक्यातील बहुतांश शासकीय तसेच कर्मचारी रेशन दुकानातुन रेशन दुकानदारांची दिशाभूल करून मोफत धान्य उचलत असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे तेव्हा गरिबांच्या मोफत धान्य योजनेत सरकारी नोकरदारांच्या घुसखोरी वाढल्याने मोफत राशन लाटणाऱ्या या शासकीय तसेच सेवनिवृत्त कर्मचाऱ्यावर कार्यवाही केव्हा होणार?अशी विचारणा येथील जागरूक नागरिक करीत आहेत.
कामठी तालुक्यात एकूण 73 हजार 719 शिधापत्रिका धारक असून अंत्योदय शिधापत्रिका धारक 7 हजार 137, प्राधान्य गटातील 39 हजार 216 शिधापत्रिका धारक आदी लाभार्थ्यांचा समावेश आहे.1 फेब्रुवारी 2014 पासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेची अंमलबजावणी सुरू आहे त्यानुसार अंत्योदय लाभार्थ्यांना प्रति माह शिधापत्रिका धारकाला 35 किलो धान्य आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती प्रतिमाह 5 किलो अन्नधान्य वितरित केल्या जात आहे परंतु काही शासकीय कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यानी सुद्धा मोफत अन्नधान्य उचल करीत असल्याची चर्चा आहे वास्तविकता मोफत अन्नधान्य वितरण योजना मुळात गरिबांसाठी असताना शासकीय नोकरदारासह सेवनिवृत्त कर्मचाऱ्यानी घुसखोरी केली आहे त्या अनुषंगाने शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने शिधापत्रिका धारकांची पडताळणी करून नियमानुसार योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी येथील जागरूक नागरिक करीत आहेत.