संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या प्रभाग क्र 16 तसेच येरखेडा ग्रा प हद्दीत येणाऱ्या यशोधरा नगर परिसर हा नवीन कामठी परिसर म्हणून ओळखला जातो .या परिसरात विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल, मोठमोठे प्रसिद्ध शिक्षण संस्था, महावितरण कार्यालय तसेच बिडी कामगारांची एक मोठी वस्ती म्हणून प्रसिद्ध पावलेली कुंभारे कॉलोनी अस्तित्वात आहे.या परिसराला लागूनच लुंबिनी नगर,छत्रपती नगर,भुराजी नगर ,आदी वस्त्या जोडलेल्या आहेत.एक मोठी लोकसंख्या असलेल्या या नवीन कामठी परिसरात विकासाचा सपाटा झाला असला तरी येथे अजूनपावेतो नागरिकांच्या आरोग्याचा काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून एकही शासकीय दवाखाना उघडू न शकल्याची खंत व्यक्त करीत नवीन कामठी परिसर आरोग्य सुविधेविना असल्याने या परिसरात आरोग्य सुविधेचा लाभ केव्हा मिळणार?असा प्रश्न येथील जागरूक नागरिक वर्ग करीत आहेत.
नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणाऱ्या कामठी शहरातील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे देशाच्या नव्हे तर जगाच्या कोण्या कोपऱ्यातून नागरिक येत असतात.या परिसरात नागरिकांची रेलचेल वाढली आहे.परिसरात रस्ते,नाली सह आदी मूलभूत सुविधांचा विकास झाला असला तरी नागरिकांच्या आरोग्यत्मक काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वपूर्ण असलेले रुग्णालय सुविधा नसणे ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.प्रभाग क्र 16,शीट नं 11,सर्व्हे नं 34 व विकास आराखड्या नुसार आरक्षण क्र 57 हे रुग्णालयासाठी राखीव आहे .तेव्हा या विकास आराखड्यानुसार मंजूर जागेत स्थानिक नगर परिषद प्रशासनाने पुढाकार घेऊन आरोग्य सुविधेची जाणीव ठेवून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र उघडावे अशी मागणी येथील माजी नगरसेवक प्रतीक पडोळे यांनी केली आहे.मात्र यांच्या या मागणिला प्रशासनाकडून केराची टोपली दाखवीत असल्याने दाद मागावी तरी कुठे?असा प्रश्न उभा होउन ठाकला आहे.
बॉक्स:;कामठी नगर परिषदेच्या विकास आराखड्यातील सर्व्हे क्र 34 येथील आरक्षण क्र 57 जागा ही आययुडीपी परिसरात रुग्णालय उघडण्यासाठी आरक्षित आहे तर एकात्मिक शहर विकास योजने अंतर्गत 9 जानेवारी 1984 अनव्ये 24 ए व 24 बी ची भूमी नगरपरिषद कामठी च्या नावाने दाखल खारीज करण्यात यावे असे आदेश शासनाने दिले आहेत त्यानुसार सदर जागेवर रुग्णालय उघडण्याचा प्रस्ताव नगर रचना विभाग नागपूरकडे सादर करण्यात आलेला आहे.शासनाने आययुडीपी अंतर्गत हॉस्पिटल उघडण्यासाठी कामठी नगर परिषदेला सर्व्हे क्र 24 ए व 24 बी ची जागा मंजूर केली आहे या जागेच्या कडेला परिसरातील नागरिकांसाठी जलकेंद्राची सोय करून सेवा कार्यरत आहे तर या जलकेंद्राच्या बाजूला हॉस्पिटल साठी मंजूर असलेली आरक्षित जागा ही मोकळी पडून आहे मात्र नगर परिषद च्या अक्षम्य दुर्लक्षित पणामुळे अतिआवश्यक असलेला हॉस्पिटल चा प्रश्न अजूनही अधांतरी आहे ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.