अरोली :- येथून जवळच असलेल्या तोंडलीतील जि प प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता तसेच गुणवत्ता पूर्ण अध्ययन अध्यापन प्रक्रिया पार पाडण्याकरिता विविध उपक्रम राबवत असते. असाच एक उपक्रम राबवत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडली येथे गुढीपाडवा मराठी नववर्षा निमित्त पुस्तकांची गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी पुस्तकाची गुढी उभारून अभ्यासाचा संकल्प केला. एक यशस्वी नागरिक होण्यासाठी व आपल्या हवे असलेले ध्येय गाठण्यासाठी पुस्तके आपल्या जीवनातील मार्गदर्शक आहेत त्यासाठी वाचन लेखनाचे महत्त्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा धुर्डे यांनी मुलांना समजावून सांगितले. या निमित्ताने शाळेतील प्रवेश पात्र विद्यार्थी तसेच पालक यांचे स्वागत करण्यात आले. अशा प्रकारे गुढीपाडवा पट वाढवा उपक्रम अंतर्गत नवागतांचे स्वागत करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडली येथे गुढीपाडवा पटवाढवा उपक्रम राबवण्यात आला.