साप्ताहिकांच्या पत्रकारांचा होणार सन्मान

– व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगच्या अधिवेशनात गौरव

छत्रपती संभाजीनगर :- व्हॉईस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विंगचे राज्यस्तरीय अधिवेशन रविवार, १८ जून २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगरातील विनोबा भावे हॉलमध्ये होत आहे. जर्नालिझम डिपार्टमेंट एमजीएम कॅम्पस येथे सकाळी १० ते सायंकाळी पाचपर्यंत या अधिवेशनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

राज्यस्तरीय या अधिवेशनाला व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, साप्ताहिक विंगचे अध्यक्ष विनोद बोरे मार्गदर्शन करणार आहेत. या अधिवेशनात साप्ताहिक विंगच्यावतीने साप्ताहिकांचे मालक, मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि पत्रकारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या के.डी वर्मा (परभणी), काकासाहेब गुटे (लातूर), सुनिल देशमुख (धाराशिव), शांताबाई मोरे (हिंगोली), डॉ. भारती मढवई (नांदेड), मुशीरखान कोटकर, (देऊळगावराजा, जि. बुलढाणा), कृष्णा हावरे (जानेफळ), सुरेश क्षीरसागर (नागपूर), सुनिल पवार (मेहकर), अनुप कुमार भार्गव (वर्धा), गणेश लावणकर (काटोल, जि. नागपूर), विकास बागडी (जालना), वैशाली चवरे (कारंजा), सुरेखा सावळे (बुलढाणा), संजय निकास (अकोला) यांचा समावेश आहे.

साप्ताहिकाशी संबंधित वरील १५ मान्यवरांचा अधिवेशनादरम्यान मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. अधिवेशनात पत्रकारांना विमा कवच प्रमाणपत्राचे वाटपही करण्यात येणार असल्याची माहिती व्हॉईस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विंगचे राज्य अध्यक्ष विनोद बोरे यांनी दिली. अधिवेशनाला साप्ताहिकाशी संबंधित पत्रकारांनी, संपादकांनी मालक व मुद्रकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही बोरे यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वातावरण तापले संदर्भ बदलले राजकारण सडले …

Sat Jun 17 , 2023
-पत्रकार हेमंत जोशी  13 आणि 14 तारखेला म्हणजे दोन दिवस लागोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुपुत्रास उल्लू बनवून त्याच्या या दिवसातल्या अस्वस्थ मनाचा गैरफायदा घेऊन श्रीकांत आणि एकनाथ यांच्या आसपास अरविंद शाह यांच्यासारखे जे अनेक संधीसाधू लबाड घातक नासलेले सडके मित्र मंडळ जमा झालेले आहे त्यापैकी एक दोघांनी खासदार श्रीकांत यांना अक्षरश: उचकवून त्यांची मुद्दाम दिशाभूल करून आणि स्वतःचे महत्व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!