संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
आता लग्नाचे निमंत्रण डिजिटल कार्ड पद्धतीने
कामठी ता प्र 30:-जीमागील दोन वर्षांपूर्वी कोरोना प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या निर्बंधाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला असून मागील वर्षी बरेच लग्नसोहळे रद्द झाल्याने आणि मर्यादित वऱ्हाडी उपस्थित राहण्याच्या निर्बंधांमुळे यंदा लग्नपत्रिका छपाईत घट झाल्याचे दिसून येत असून आता मोबाईलच्या माध्यमातूनच जास्तीत जास्त पत्रिका पाठविल्या जात आहेत.
कोरोना प्रादुर्भावामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी राज्य शासनाने काही मार्गदर्शक सूचना लागू केल्या होत्या.कोरोनानंतर आता लोकांना लग्नातील अवाजवी खर्च वायफळ वाटू लागला आहे.सध्या लग्न सोहळे साध्या पद्धतीने होत आहेत.दिवसेंदिवस आता कुणाकडे पारंपरिक पध्दतीने आधीसारखे लग्न कार्याची कामे करायला वेळ उरला नाही तसेच लोकलाजीसाठी होणारा वायफळ खर्च हे नागरिकांनी बंद केले आहे.ज्यामुळे लग्न असले तरी मुख्य नातेवाईकांकडे पत्रिका पाठवितात व मित्र मंडळी , सहकारी कर्मचारी किंवा दूरच्या नातेवाईकानाही व्हाट्सएप वर डिजिटल कार्ड बनवून पाठविण्याचे चलन वाढले आहे.
विवाह पत्रिकांचे ट्रेंड होताहेत जुने
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com