राष्ट्रसेवेसाठी आपण संस्कृतीचा धागा पकडला – अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय वाटमोडे यांचे प्रतिपादन

– रासेयोच्या राष्ट्रीय एकता शिबिराचा समारोप

नागपूर :- आपणास राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक कोणीही बनविले नाही. स्वतःहून सेवा देण्याकरिता स्वयंसेवक म्हणून तुम्ही समोर आला आहात. रासेयो स्वयंसेवक म्हणून राष्ट्र सेवेसाठी आपण संस्कृतीचा धागा पकडला असल्याचे प्रतिपादन मानव विज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय वाटमोडे यांनी केले. भारत सरकारचे युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय, रासेयो प्रादेशिक संचालनालय यांच्या सौजन्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या यजमानाखाली रासेयोचे ६ दिवसीय निवासी राष्ट्रीय एकता शिबिर गुरुनानक भवन येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप शनिवार, दिनांक ४ मार्च २०२३ रोजी दुपारी ३ वाजता करण्यात आला. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. वाटमोडे बोलत होते.

रासेयो शिबिरामधून युवकांना ‘सेवा’ हा विचार मिळतो. विचार तसेच आचरणामध्ये बदल होत समाजाकरिता जगणार्या व्यक्तीत त्याचे परिवर्तन होते. स्वयंसेवक स्वतःच्या नव्हे तर समाज आणि राष्ट्रासाठी जगतो. अशा शिबिरामधूनच युवकांना समाज, राष्ट्राच्या विकासासाठी आपण काय करू शकतो, याचे विचार मिळतात. याबाबत पुढे बोलताना डॉ. वाटमोडे यांनी महाभारतातील गुरुकुलात कौरव- पांडवांचे उदाहरण दिले. रासेयोच्या विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव असल्याचे कोरोना काळातील एक उदाहरण त्यांनी दिले. त्या युवकाच्या प्रयत्नामुळे बुटीबोरी जवळ असलेल्या असलेल्या एका गावामध्ये एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नसल्याचे त्यांनी सांगितले.

समारोपय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय वाटमोडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून रासेयो प्रादेशिक संचालनालयाचे डॉ. कार्तिकेयन, डॉ शरद बोरडे, युवा अधिकारी डॉ. अजय शिंदे, रासेयो संचालक डॉ. सोपानदेव पिसे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाचे सांस्कृतिक समन्वयक प्रमोद तिजारे, अशोक मोंदेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

विद्यापीठ गीत व रासेयो गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांनी दीप प्रज्वलन करीत राष्ट्रपिता महात्मा गांधी व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाराष्ट्र व गोवा राज्य रासेयो प्रादेशिक संचालक डॉ. कार्तिकेयन यांनी या शिबिराची आयुष्यभर आठवण राहणार असल्याचे सांगितले. सर्व विद्यार्थी एकमेकांना सहकार्य करणारे होते. सुज्ञ विद्यार्थी असल्याने शिबिराचे सात दिवस कसे गेले हे कळलेच नसल्याचे ते म्हणाले. शिबिराच्या आयोजनाबाबत भारत सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाचे त्यांनी आभार मानले. सोबतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांच्या उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक करीत त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. यावेळी प्रमोद तिजारे यांनी देखील मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात डॉ. शरद बोरडे यांच्यासह मध्य प्रदेशातून आलेले कार्यक्रम अधिकारी रोहित जैन व तामिळनाडू येथील डॉ. कविता यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पश्चिम बंगाल येथील शुभोजीत, आसाम येथील जिमोनी चौधरी, केरला येथील मेधा, गुजरात येथील प्रेरक, महाराष्ट्रातील पृथ्वी राऊत आदी विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. रासेयो संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांनी राष्ट्रीय स्तरावरील शिबिराचे यजमानपद दिल्याने भारत सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय त्याचप्रमाणे रासेयो प्रादेशिक संचालनालय यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांनी देखील स्वयं शिस्त राखत शिबिर यशस्वी केल्याने त्यांचे देखील अभिनंदन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रीपेड ऑटो चालकांचे स्टेशनवर स्वच्छता अभियान

Mon Mar 6 , 2023
नागपूर :- जी-20 निमित्त शहराला सुशोभीत आणि चकचकीत केले जात आहे. ठिकठीकानी रंगरंगोटी आणि भिंतीवर चित्र काढले जात आहेत. यावरून प्रेरणा घेत लोकसेवा प्रीपेड बुथ ऑटो चालक मालक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी रेल्वेस्थानक ऑटो थांबा परीसरात स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ केला. संघटनेचे अध्यक्ष अल्ताफ अंसारी यांनी स्वयंप्रेरणेने प्रीपेड बुथ थांब्यावर स्वच्छता मोहीम राबविली. शहर स्वच्छ होत असताना आपणही आपल्या थांब्यावर स्वच्छता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com